शेतात निंदन करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने ती महिला ठार होण्याची घटना भद्रावती तालुक्यातील टेकाडी(दी.) शेतशिवारात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. लक्ष्मीबाई रामराव कन्नाके (६०) रा. टेकाडी(दी.) असे मृत महिलेचे नाव असून ती आपल्या शेतात सुनेसोबत निंदनाचे काम करीत होती. दरम्यान सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एका पट्टेदार वाघाने तिच्यावर हल्ला केला. त्यात ती […]
चंद्रपुर
जनसंवाद पदयात्रा ठरणार ऐतिहासिक : जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे.
चंद्रपूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा. श्री. नानाभाऊ पटोले साहेब यांच्या निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते जननायक राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर दि. ३ ते १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान ‘जनसंवाद पदयात्रा’ चे आयोजन करण्यात येते आहे. ही जनसंवाद पदयात्रा ऐतिहासिक ठरणार असून पदयात्रेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हयातील […]
सिध्दबली ईस्पातच्या पूर्व कामगारांना रोजगार व थकीत वेतन तातडीने निर्गमित करा – हंसराज अहीर
चंद्रपूऱ- सिध्दबली ईस्पात लिमी. कंपनी, आरसीसीपीएल (परसोडा लाईमस्टोन) विसापूर प्रस्तावीत कोळसा खाण आदी विषयाशी निगडीत विविध प्रश्नांबाबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाद्वारे दि. 25 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, पोलिस निरीक्षक पडोली शिवाजी […]
पहिल्यांदाच तयार होणार चंद्रपूर जिल्ह्याचे मराठी गॅझेटिअर
नागरिकांच्या योग्य सुचना व अभिप्रायसाठी 1 महिना जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध पत्रकार परिषदेत जिल्हाधिका-यांची माहिती चंद्रपूर : ‘गॅझेटिअर’ (दर्शनिका) हे कोणत्याही जिल्ह्यासाठी मौल्यवान व संदर्भमुल्य आधारीत अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ असतो. ब्रिटीश काळात 1909 मध्ये जिल्ह्याच्या गॅझेटिअरची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. तर स्वातंत्र्यानंतर 1973 मध्ये याच ग्रंथाची सुधारीत आवृत्ती प्रकाशित झाली. आता मात्र पहिल्यांदाच […]
*राज्यात रुग्णवाहिका चालकांचे १ सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद*
राजुरा :– इतर राज्यांच्या तुलनेत अतिशय कमी मोबदला मिळत असल्याने समान काम समान दाम तत्त्वावर मोबदला देण्याच्या मागणीसाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांनी संपूर्ण राज्यात 1 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अपघात व इतर संकटसमयी रुग्णसेवेसाठी १०८ क्रमांक डायल केल्यास तत्परतेने धावून येणाऱ्या रुग्णवाहिकेवर बीव्हीजी कंपनीकडून खासगी […]
जिल्हा प्रशासनाचा सिंबॉयसीस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सोबत सामंजस्य करार
चंद्रपूर : विकसीत भारत @ 2047 अंतर्गत जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळ्या विभागाअंतर्गत सात समित्यांचे गठण करण्यात आले असून सदर आराखडा तयारीच्या संदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा प्रशासन व पुणे येथील सिंबॉयसीस स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक […]
दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिकेचे लोकार्पण
चंद्रपूर : दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करण्यात आली. निश्चितच हा अभिनंदनीय उपक्रम आहे. या अभ्यासिकेमुळे अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची सुविधा होणार आहे. अभ्यासिका ही संविधान वाचन करणारे केंद्र आहे. मागील काही वर्षांत संविधान धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संविधान वाचवायचे असेल, तर संविधानाची अंमलबजावणी करणारे संसेदत […]
*अवैद्य दारू विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करावी. पिंपरी दीक्षित महिलांचा एल्गार*
अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीकरीता, पिपरी दिक्षीत येथील ग्रामस्थांनी आज पोलिस स्टेशनवर धडक दिल्याने, प्रशासनात खळबळ माजली. मागील अनेक वर्षापासून तालुक्यात अवैद्य दारू विक्री केली जात असल्यांने, महिलांमद्ये संताप व्यक्त केला जात आहे. या अवैदय दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून, लहान मुलेही दारूच्या आहारी जात आहे. यामधे शाळा कॉलेजच्या तरुण पिढीचा समावेश आहे. […]
उद्या दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर अभ्यासिकेचे उदघाटन
चंद्रपूर: दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या शिक्षण आणि लोकसेवेच्या समर्पणाला भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिके “चे उद्घाटन शनिवार 19 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. चंद्रपूर येथील भिवापूर वॉर्डातील साई मंदिरात हा कार्यक्रम होणार असून, दिवंगत खासदार बाळू धानोरकर मित्र परिवाराने याचे आयोजन केले […]
*आम आदमी पार्टीच्या तिरंगा यात्रेमुळे चंद्रपुरात परिवर्तनाची लहर*
चंद्रपूर- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पार्टी चंद्रपूरच्या वतीने शहरातून तिरंगा यात्रा काढण्यात आली. आम आदमी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत शहरात राजकीय ताकदीचे प्रदर्शन दिसून आले. शहरातील पक्ष बांधणीच्या विस्तारासाठी तिरंगा यात्रा अत्यंत महत्त्वाची होती. भारत देश आपल्या स्वातंत्र्याचा 76 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करीत […]









