चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

Tiger Pictures | Download Free Images & Stock Photos on Unsplashशेतात निंदन करायला गेलेल्या महिलेवर  वाघाने हल्ला केल्याने ती महिला ठार होण्याची घटना भद्रावती तालुक्यातील टेकाडी(दी.) शेतशिवारात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.  लक्ष्मीबाई रामराव कन्नाके (६०) रा. टेकाडी(दी.) असे मृत महिलेचे नाव असून ती आपल्या शेतात सुनेसोबत निंदनाचे काम करीत होती. दरम्यान सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एका पट्टेदार वाघाने तिच्यावर हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी  झाल्याने जागीच ठार झाली. आजुबाजुच्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने लक्ष्मीबाईला जागीच सोडून जंगलाच्या दिशेने धुम ठोकली. या घटनेची माहिती वनविभाग आणि पोलिसांना देण्यात आली असून वृत्त लिहीपर्यंत कार्यवाही चालू होती.

घटनास्थळी टेकाडीचे पोलिस पाटील सुभाष झाडे, वनरक्षक जनबंधू, गणेश गायकवाड आणि इतर गावकरी उपस्थित झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.