चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

आज जिल्ह्यातील 92 ग्रामपंचायतींची मतमोजणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील 92 ग्रामपंचायतींसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. कोरपना तालुक्यातील बिबी येथे मतदान यंत्रात बिघाड आला. त्यामुळे सायंकाळी साडेपाच वाजतानंतरही जवळपास दोनशे मतदार रांगेत होते. आज सोमवारी तालुकास्थळी मतमोजणी होणार आहे. यंदा पहिल्यांदाच जनतेतून सरपंचाची निवड होणार आहे. सरासरी 70 टक्के मतदान झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, चिमूर, मूल, जिवती, कोरपना, राजुरा आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील मुदत संपुष्टात आलेल्या 92 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला होता. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गावखेड्यातील वातावरण चांगलेच तापले होते. 92 ग्रामपंचायतींपैकी जिवती तालुक्यातील पिटीगुडा आणि चिमूर तालुक्यातील नवीन जामणी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे रविवारी 92 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यासाठी 281 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. सकाळी साडेसात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. रविवारी सुटीचा दिवस असल्याने सकाळपासून काही मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली. सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजतापर्यंत 13.96 टक्के मतदान झाले. त्यानंतर साडेअकरा वाजतापर्यंत 30. 17 टक्के मतदान झाले. दुपारी तीन ते साडेपाच वाजतापर्यंत मतदानाला वेग आला. साडेतीन वाजतापर्यंत 61.50 टक्के मतदान झाले. राजुरा तालुक्या ३० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 28 सरपंच आणि 187 सदस्य पदासाठी 89 केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. कोरपना तालुक्यात पंचेवीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.