चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

समाजाच्‍या सत्‍काराने मला प्रेरणा, ऊर्जा, लढण्‍याची आणि बदल घडविण्‍याची शक्‍ती मिळाली – सुधीर मुनगंटीवार

आर्यवैश्‍य समाजातर्फे श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्‍कार व नोटबुक तुला कार्यक्रम संपन्‍न

राष्‍ट्र उभारणीकरिता संघर्ष करणारा, सांस्‍कृतिकमानवी मुल्‍यनैतिकता व राष्‍ट्रहित जपणारा सात्‍वीक व प्रामाणिकपणा जपणारा हा माझा समाज आहे. ज्‍या मॉं वासवी कन्‍यका मंदीरात मी लहानाचा मोठा झालो, त्‍याच मंदीरात माझ्या समाजबांधवांकडून माझा झालेला सत्‍कार हा बॅंकाकसिंगापूर येथे झालेल्‍या सत्‍कारापेक्षाही मोठा व महत्‍वाचा आहे. या सत्‍काराने मला प्रेरणाऊर्जालढण्‍याची आणि बदल घडविण्‍याची शक्‍ती दिली आहेअसे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍याचे वनेसांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री महाराष्‍ट्र राज्‍य तथा चंद्रपूर व गोंदिया जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दिनांक १६ ऑक्‍टोंबर रोजी स्‍थानिक श्री कन्‍यका देवस्‍थान सभागृह चंद्रपूर येथे आर्यवैश्‍य समाज चंद्रपूरतर्फे श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्‍कार व नोटबुक तुला करण्‍यात आली. यावेळी बाजार वार्डातील श्री. मुनगंटीवार यांच्‍या कार्यालयातुन ढोल-ताश्‍याच्‍या गजरातफटक्‍यांच्‍या आतीशबाजीत त्‍यांची मिरवणूक श्री कन्‍यका देवस्‍थान सभागृहापर्यंत नेण्‍यात आली व व्‍यासपीठापर्यंत त्‍यांच्‍यावर पुष्‍पवृष्‍टी करण्‍यात आली. यावेळी श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासोबत कार्यक्रमाचे अध्‍यक्ष सुधाकरराव चकनलवारश्री माता कन्‍यका देवस्‍थान ट्रस्‍टचे अध्‍यक्ष मिलींद कोतपल्‍लीवारउपाध्‍यक्ष संदीप पोशट्टीवारसचिव राजेश्‍वर चिंतावार यांची व्‍यासपीठावर व सहसचिव प्रशांत कोलप्‍याकवारकोषाध्‍यक्ष अजय मामीडवारराजु सुरावारउदय बुध्‍दावार, श्रीराम झुल्‍लुरवार, महेश कल्‍लुरवारअमित कासनगोट्टूवारगिरिधर उपगन्‍लावार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. ९ ऑगस्‍ट २०२२ ला मी वनेसांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री झाल्‍यापासून माझे अनेक सत्‍कार झालेपरंतु आजचा सत्‍कार हा घरचा आहे. प्रिय समाजबांधवांकडून व ज्‍येष्‍ठांकडून झालेला माझा सत्‍कार हा जगातील सर्वात मोठा सत्‍कार आहे. यामधुन मला प्रेरणा मिळालीज्‍येष्‍ठांचा आशीर्वाद मिळाला. मी आपल्‍या समाजाचा आ‍शीर्वाद घेऊन इतर सर्व समाजाचे कल्‍याण करण्‍याचे संकल्‍प करून कंकण बांधून घेत आहे. मी ज्‍या दिवशी मंत्री झालो त्‍यादिवशी सर्वात पहिले काम करायच्‍या विकासाकामांची यादी केली. ज्‍यामध्‍ये ११४ कामे प्राधान्‍याने पूर्ण करायची आहेत. आपला आशीर्वाद आणि प्रेरणा माझ्या पाठीशी असल्‍यामुळे अधिकची दिडशे कामे येत्‍या दोन वर्षात पूर्ण करेन, असा मला विश्‍वास आहे असेही ते यावेळी म्‍हणाले. ५ वर्षाच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या काळात भिमाशंकर देवस्‍थानाचा विकासपंढरपूर येथे तुळशी वृंदावनशिखर शिंगणापूर येथे १२०० विविध जातीच्‍या बेल वृक्षांची यशस्‍वी लागवड केली. यामुळे मला कायमच आध्‍यात्‍मीक व आत्‍मीक आनंद मिळाला आहे. चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालयकॅन्‍सर हॉस्‍पीटलनियोजन भवनअजयपूर येथे फॉर्मर्स ट्रेनींग इंस्‍टीटयुट सेंटरसोमनाथ येथे कृषी महाविद्यालयगोंडवाना विद्यापीठाची इमारतएपीजे अब्‍दुल कलाम गार्डनबॉटनिकल गार्डनमुर्ती येथील विमानतळसैनिकी शाळा यासारख्‍या १५४ विकासकामांना पूर्तता देता आली. हे कार्य मला कन्‍यका मॉ वासवी कन्‍यका यांच्‍या आशीर्वादाने करता आले. Bआर्यवैश्‍य समाजाअंतर्गत श्री कन्‍यका परमेश्‍वरी ग्रुप चंद्रपूरच्‍या वतीने यावेळी सत्‍कार सोहळा व नोटबुक तुला या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी समाजातील गरजू व गरीब बांधवांकरीता विश्‍वगौरव नरेंद्रभाई मोदी यांच्‍याद्वारे कार्यान्‍वीत १७८ योजनांच्‍या माध्‍यमातुन समाजाचा मोठया प्रमाणात विकास करता येईल. शासन कायमच समाजाच्‍या पाठीशी उभे आहेअसेही श्री. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. कार्यक्रमाचे अध्‍यक्ष सुधाकरराव चकनलवार म्‍हणालेसुधीर मुनगंटीवार हा समाजाचा गौरव आहे. यावेळी राजेश्‍वर चिंतावारसंदीप पोशट्टीवार यांनी व समाजातील प्रतिष्‍ठीत नागरिकांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे संचालन सौ. मंजुषा भास्‍करवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत कोलप्‍याकवार यांनी केले. यावेळी समाजातील अनेक संस्‍थांनी व समाजबांधवांनी श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्‍कार केला. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेकरिता वैभव कोतपल्‍लीवारमनोज राघमवारसंतोष तुंडूलवारराजेंद्र आल्‍लुरवारशिरीष रेगुंडवारअखिलेश आईंचवारचैतन्‍य पडगिलवार यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी समाजबांधवांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *