
चंद्रपुर :- दिनांक २०/०५/२०२२ सिदार्थ हॉटेलच्या बाजुना असलेल्या एस. बी. आय. बँक समोरून होंडा अमेझ गाडी चालकास सांगितले की, तुमच्या गाडीचे आईल लिकेज होत आहे यावरून फिर्यादी व चालक यांनी गाडीचे खाली उतरून इंजनची पाहणी केली असता, यातील दोन अज्ञात इसमांनी संधीचा फायदा घेवुन कार मध्ये ठेवलेल्या पैश्याची बैंक ज्यामध्ये ११,१०,०००/-रू घेवून फरार झाले. नमुद गुन्हयाचे गांभीर्य पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी , पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांचे मार्गदर्शनात गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा व चोरीस गेलेल्या रोख रक्कमचा शोध घेणे कामी पोलीस स्टेशन, रामनगर येथील डी.बी पथक मधील सपोनि हर्बल अकरे तसेच पोउपनि विनोद भुरले यांचे दोन वेगवेगळे पथक तयार करून आरोपीचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेणे कामी रवाना झाले. तसेच गुन्हयाचे घटनास्थळावरील सी.सी.टि.व्ही. फुटेज व सायबर पोलीस ठाणे यांचे मार्फतीने तांत्रीक बाबीचा तपास करण्यात आला. सदर गुन्हयाचे घटनास्थळा वरील प्राप्त फुटेज व तांत्रीक बाबी वरून अज्ञात आरोपीतांची माहिती प्राप्त होताच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी हे रवाना झाले. गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा दोन दिवस व रात्रौ परिश्रम घेवुन अज्ञात आरोपीतांची माहिती ही राज्या तेलंगना आंध्रप्रदेश, कनार्टक (यादगीर), सोलापुर (पंढरपूर) पर्यंत पाठलाग करून आरोपीतांना रेलवे स्टेशन चंद्रपुर येथून चार पुरुष व दोन महिलाना अटक करण्यात आले आहे. आरोपीकडून नगदी १०,०००/रु, होन्डा ट्रिगर मोटर सायकल ५०,०००/- रु., होन्डा युनिकॉन मोटर सायकल ५०,०००/- रुपये, ३ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल किंतम अंदाजे ३,०००/, २२ नग वेगवेगळ्या कंपनीचे सिम कार्ड असा माल जप्त करण्यात आला आहे तसेच आरोपीतांना गुन्हा करण्याचे पादती बाबत विचारणा केली असता, ज्याठिकाणी गुन्हा करायचे असते त्या शहरामध्ये येवुन सदर महिलांचे मार्फेतीन शहरात रूम भांडयाने करून राहतात व अंदाजे १५ ते २० दिवस शहरामधुन बँका तसेच ज्वेलर्स शॉप यांचेवर नजर ठेवून येणा-या जाणा-या लोकांचा अभ्यास करतात व बँके मधुम पैसे काढुन चार चाकी व दुचाकी वाहनाने जाणा-या लोकाना टारगेट करून त्याच वाहनाचे खाली ऑईल टाकुन / अंगावर यंकन / घाण टाकुन गाडीचे टायर पंचर आहे असे बतावणी करून इत्यादी प्रकाराने त्यांचे लक्ष्य विचलीत करून त्यांचे गाडी मध्ये ठेवलेले पैसे घेवुन पळुन जातात. यातील आरोपीतांनी यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मुलुक, मांडूक, पनवेल, अमरावती, वरोरा तसेच चंदपुर तसेच इतर राज्यात सुद्धा अशाच प्रकार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता वरीष्ठ अधिका-यांचे वेळो वेळी मार्गदर्शन चंदन तसेच सायबर सेल चंदपुर यांचे मदतीने गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.




