चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

इरई पदयात्रा, नदी पात्रात जलसत्याग्रह व उपोषण

चंद्रपूरची जीवनदायनी इरई नदीच्या दाताळा पूल ते हडस्ती पर्यन्त खोलीकरणाच्या मागणीकरिता रविवार 2 ऑक्टोबर 2022 म. गांधी जयंती रोजी आरवट पूल इरई पात्र ते दाताळा पूल पात्रा पर्यन्त इरई पदयात्रा पुरपीडित भागातून काढण्यात येऊन दाताळा पुलाखाली इरई नदीच्या पात्रात जलसत्याग्रह करण्यात आला.
इरई बचाव जनआंदोलन, वृक्षाई, आम आदमी पार्टी चंद्रपूर च्या संयुक्त विद्दमाने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला चंद्रपूरकरांनी उतस्पुर्त प्रतिसाद दिला.
स.12 वाजता आरवट पात्रात इरई नदी बचाव जणांदोलनाचे संयोजक व वृक्षाई चे संस्थापक ट्री बॉय अजिंक्य कायरकर चे वडील कुशाब कायरकर, आप चे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष मयूर रायकवार यांनी नदीचे पूजन केल्यानंतर पदयात्रेला सुरवात झाली. पदयात्रा पुरपीडित भागातून पठानपुरा- विठ्ठल मंदिर -गोपालपुरी-बिनबा गेट-म. फुले चौक-स्वावलंबी नगर येथे पोहचल्या नंतर इरई कन्यानीं पदयात्रेत सामील चंद्रपूरकरांवर पुष्पवृष्टी करीत त्यांचे भावनिक स्वागत केले. पदयात्रा दाताला पात्रात पोहचल्या नंतर इरई नदीच्या प्रवाहात वृक्षाई,आप,विदर्भ राज्य समितीच्या कार्यकर्त्यांनी “इरई नदीचे खोलीकारण करा, चंद्रपूरकरांना महापुरापासून वाचवा” अश्या घोषणा देत जलसत्याग्रह केला.कायरकर यांचं सकाळ पासून उपोषण होत.आपले मनोगत व्यक्त करतांना जनआंदोलनाचे कुशाब कायरकर यांनी इरई नदी सारखी 90 मीटर(300फूट) रुंद नदी खूप कमी महानगराच्या मध्य भागातून वाहते, चंद्रपूरकर नशीबवान होते परंतु इरई मृतप्राय होत असतांना “नर्मदा बचाव “नंतर जल संपदा दिन 22 मार्च 2006 पासून “इरई बचाव जनआंदोलनाची “महूर्तमेढ 26 वर्षांपासून आपला प्रत्येक वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करणाऱ्या व ट्री बॉय म्हणून प्रसिद्ध अजिंक्य कायरकर याच्या प्रेरनेणे झाल्याचे व मागील 16 वर्षांपासून हा लढा मीडियाच्या सहकार्याने लढत असल्याची व इरईचे कल्याण व पुरापासून चंद्रपूरकरांना मुक्ती मिळेपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
समस्त पदाधिकारी-सदस्य 6 किलोमीटर पायी चालत, पुरपीडितांचे दुःख दूर करण्यासाठी खूप कष्ट घेत असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूरकर देत आहे. या आंदोलनात प्रामुख्याने इरई कन्या गीता अत्रे, रेखा चांभारे, प्रीती लांडे,पायल घोडमारे, विभा टोंगे, सारिका जाधव, उज्वला नांदे,भुमी कायरकर, शुभांगी खाडिलकर व प्रतिभा कायरकर इरई पुत्र विठ्ठल भगत, रामकृष्ण खा मणकर, विदर्भवादी अंकुश वाघमारे,योगेश मुरेकर,आप चे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, संतोष बापचे, राजू कुडे, सिकंदर सागोरे, सुजाता बोन्दले, सुजाता देठे, सुनिल सदभय्या, सुनिल भोयर, शंकर धुमाळे,सुधीर पाटील, नागसेन लभाने,प्रदीप वाळके,जितेंद्र भाटिया, डॉ. सलीम तुकडी, प्रफुल मल्लेलवार, अशोक माहूरकर, धवले, गजानन बनसोडे, पुंडलिक गोठे, स्वप्नील घागरगुंडे चे अथक प्रयत्न लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.