चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मोबाईल न बघू दिल्याने मुलाने रचले अपहरणाचे नाट्य

चंद्रपूर :  वडीलांनी मोबाईल बघू दिला नाही, या कारणाने एका मुलाने अपहरणाचा बनाव केला. शहरातील एका अकरा वर्षाच्या मुलाला मोबाईलचे प्रचंड वेड. नेहमीप्रमाणे तो मोबाईलवर गेम खेळत होता. त्यामुळे वडीलाने त्याला हटकले. त्याचा राग त्याने मनात ठेवला. शाळेत जात असतानात त्याने अपहरणाचा डाव रचला. काही लोकांनी पेढा खायला दिला. मी तो खाल्ला नाही. त्यामुळे त्या लोकांनी तोंडावर रुमाल बांधून मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, अशी कहाणी त्याने शाळेत सांगितले. शाळेतून त्याच्या घरी संपर्क साधण्यात आला. त्याचे वडील शाळेत आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत मुलाने दाखविलेल्या जागेवरील सीसीटीव्ही फुटेज बघितले. मात्र, त्यात असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे दिसून आले. काही वेळाने पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर त्याने खरी हकीकत सांगितली. मोबाईल बघू दिला नसल्याने आणि मला शाळेत जायचे नव्हते या कारणाने आपण असा बनाव केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.