
चंद्रपुर :- जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात व्याघ्रसफारी करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्यात सुमारे तीन महिने ताडोबा प्रकल्प पर्यटनासाठी बंद असतो. यंदाही 1 जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी बंद करण्यात आला होता. एक जुलैपासूनची कोअर क्षेत्राची ऑनलाइन बुकिंग सुद्धा बंद करण्यात आली होती. दरम्यान आता 1 ऑक्टोबर पासून कोअर झोन मध्ये पर्यटन सुरू होणार आहे.
हमखास व्याघ्र दर्शनासाठी चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे पर्यटनासाठी येत असतात. जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे व्याघ्रप्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवण्यात येतात. मातीचे रस्ते असल्याने संरक्षित जंगलांमध्ये भ्रमंती करणे कठीण असते. त्यामुळे ताडोबाचा कोअर झोन पावसाळ्यात पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो. अशातच आता 1 ऑक्टोबर पासून ताडोबातील पर्यटन सुरू होणार आहे.



