चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस २० वर्ष कारावास

पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर परिसरातील अल्पवइन मुलीला फुस लावुन नेउन तिचेवर बलात्कार करणार आरोपी नामे- उमेश शिल रा. भिवापुर वार्ड, चंद्रपुर यास दिनांक ०७/०९/२०२२ रोजी मा. श्री. ए. व्ही . दिक्षीत सा. सत्र न्यायधीश न्यायालय चंद्रपुर यांनी २० वर्ष कारावसाची शिक्षा व ५००० रु दंडाची शिक्षा सुनावली आहे. घटना ता. वेळी व ठिकाणी फिर्यादिची अल्पवयीन मुलीला फुस लावुन घराशेजारी खेळत असताना तिला मोटार सायकल वर नेले व तिचेवर घरात नेउन जबरी संभोग केला असताना फिर्यादिचे तोंडी रिपोर्ट वरून अप.क्र. ५६० / २०२० कलम ३६६,३७६ (अ ब), ३७६ (२) (फ) भा.द.वि. व ५ (एम.) (एन. ) ६ पोक्सो. कायदा, चा गुन्हा नोंद करण्यात आला. सदर चा गुन्हा तपासात घेतल्यावर तपास अधिकारी महिला पो.उपनि. प्राजक्ता नागपुरे यांनी आरोपी निष्पन करुन पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. न्यायालयाचे सुनावनी दरम्यान सदर प्रकरणात साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक ०७/०९/२०२२ आरोपी यास मा. न्यायालयाने कलम ३६६, ३७६ (अ ब),३७६ (२), (फ) भा.द.वि. व ५ (एम.) (एन.)६ पोक्सो कायदा मध्ये २० वर्ष सजा व ५००० रु दंड, दंड न भरल्यास ६ महीने साधा कारावास मा.श्री.ए.व्ही . दिक्षीत सा. सत्र न्यायधीश न्यायालय चंद्रपुर यांनी सुनावली आहे. सदर प्रकरण मध्ये स्वाती देशपांडे सरकारी वकील चंद्रपुर आणि कोर्ट पैरवी पो.हवा .७८३ संतोष पवार पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published.