कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात ते आधीच केले होते. त्यामुळे अनेक कंपन्या, कारखाने, फॅक्टरी बंद आहेत. वाहतूक वाहने संपूर्ण ऑफिसेस बंद करण्यात आल्याने याचा मोठा परिणाम हवामानाच्या गुणवत्तेवर झाल्याचे दिसून येत आहे. दररोजच्या हवा गुणवत्ता निर्देशांक नुसार, लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी चांगलीच कमी झाली आहे. चंद्रपूर मध्ये २०१९ च्या मार्च महिन्याच्या तुलनेत यावर्षी २०२० मध्ये ४८.२ टक्के धूळ प्रदूषण कमी झाले आहे. ती ह्या आठवड्यात पुन्हा कमी झाली. गेल्या आठवड्यात प्रदूषणाची पातळी चंद्रपुरात ४८ टक्के ने कमी झाली आहे. श्वसनासाठी धोका वाढवू शकणाèया, नायट्रोजन ऑक्साईडच्या (एनओएक्स) प्रदूषणाची पातळी देखील कमी झाली आहे.
नायट्रोजनचं प्रदूषण मुख्यतः मोटार वाहनांच्या वाहतुकीमुळे होतं. पुण्यात नायट्रोजन ऑक्साईडचं प्रमाण ४५ टक्क्यांनी कमी झालं आहे. तर मुंबई ३८ टक्क्यांनी आणि अहमदाबादमध्ये ५८ टक्क्यांनी कमी झालं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे लोक घरीच आहेत. अनेक जण वर्क फ्रॉक होम करतायेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कमी आहे. वाहतूक बंद असल्याने गाड्यांचा धूर, धुळही कमी झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांत मोकळा श्वास न घेतलेली मुंबई, अहमदाबाद, पुणे यांसारखी अनेक मोठी शहर लॉकडाऊनच्या निमित्ताने मोकळा श्वास घेतांना दिसतायेत. मार्च २०१९ मध्ये मुंबई तील हवा एक्यूआय १५३ होती. मात्र आता, २०२० मार्च महिन्यात मुंबईतील वायुची शुद्धता एक्यूआय ६६ इतकी नोंदवण्यात आली आहे. लॉकडाऊननंतर आता दिल्लीत स्थिती चांगली. वायूप्रदुषण कमी झाल्याची नोंद करण्यात आली. चंद्रपूर, नागपुर, महाराष्ट्र आणि देशातच प्रदूषण ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाले आहे, अशी माहिती ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा.सुरेश चोपणे यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी प्रदुषणाची रिपोर्ट राज्यातील पंचवीस शहरांमध्ये सर्वाधिक प्रदुषित शहराच्या रुपात चंद्रपूर शहराचा उल्लेख करण्यात आला आहे. धुळ प्रदुषणाने चंद्रपूर गेल्या आठ वर्षांपासुन क्रमांक एक वर आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अनुसार जिल्ह्यात सद्यःस्थितीत ५६४ कारखाने आहेत. यामध्ये २०१ कारखाने रेड झोन मध्ये आहे. तर १८० कारखाने मध्यम प्रदुषणकारी आहेत. ग्रीन झोनमध्ये १८३ कारखान्यांचा समावेश आहे. चंद्रपूर शहरापासुन ४० किलोमीटर अंतरावर ३० पेक्षा अधिक कोळसा खाणी आहेत. या खाणीतुन ३८,००० मेट्रिक टन कोळसा प्राप्त होतो. तसेच त्याच परिसरात ४ मोठे थर्मल प्लँटधुळ व धुर आकाशात सोडतात. त्यामुळे प्रदुषण सतत वाढत आहे. याशिवाय १६ पेक्षा अधिक अवैध कोल डेपो जे प्रदुषण पसरवत आहे. त्यांना सुद्धा बंद करण्यात आले पण प्रदुषणाच्या मात्रेत काहीही फरक पडला नाही, असे आढळते. हिच परिस्थिती अस्तित्वात असलेल्या मोठ्या नद्यांची सुद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्यातरी चंद्रपूर शहराचे प्रदुषण सर्वाधिक मानल्या जात आहे.
धुळ प्रदुषण मोठ्या प्रमाणावर आहे. वातावरणात सल्फर डॉय ऑक्साईडे, बेंजींग, ओझोन आणि नायट्रोजन डॉय ऑक्साईडचे प्रदुषण मोठ्या प्रमाणावर आहे. वातावरणात सल्फर डॉय ऑक्साईड, बेंजींग, ओझोन आणि नायट्रोजन डॉय ऑक्साईडचे प्रदुषण सतत वाढत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वत्र वाहतूक थांबलेली आहे. हा फार मोठा परिणाम आहे. पर्यावरणाचे संतुलन बरोबर होत आहे. त्यामुळे देशभरातच मोठ्या प्रमाणावर यापूर्वी प्रदुषण होत होते. नोयडा, नागपुर, चंद्रपूर आदी भागातील प्रदुषण वाढीवर होते पण आता लॉकडाऊनमुळे प्रदुषणाला आळा बसला आहे. ही चांगली गोष्ट आहे. प्रदुषण कमी होण्याचे कारण म्हणजे उद्योगांचे उत्पादन बंद, दुचाकी, चारचाकी, बस यांची वाहतूक बंद व रेल्वे गाड्याच्या लॉकडाऊनमुळे प्रदुषणात फार मोठी घट झाली आहे.
