
चंद्रपूर (का.प्र.)चंद्रपूर जिल्हयात तापणारा तिव्र उन्हाळा लक्षात घेता जिल्हयातील ग्रामीण व नागरी भागातील पाणी टंचाई निवारण्याच्या दृष्टीने सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून आराखडा तयार करावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे. यासंदर्भात चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त व सर्व नगर पालिकांचे मुख्याधिकारी व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाèयांना त्यांनी सूचना दिल्या आहेत.चंद्रपूर जिल्हा हा सर्वात जास्त उष्णतामान असणारा जिल्हा आहे. देशातील पहिल्या १० जिल्हयांमध्ये उष्णतेसंदर्भातील क्रमवारीत चंद्रपूर जिल्हयाचा क्रमांक येतो. उनहाळी झळा तापायला लागल्या असून जिल्हयातील पाणी टंचाई सुध्दा तिव्र होत हात आहे.
सर्व सामान्य जनतेला याचा त्रास येत्या काळात होवू नये यादृष्टीने चंद्रपूर जिल्हयातील नागरी व ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून १५ दिवसात पाणी टंचाईवर मात करण्याचे नियोजन करावे अशी सूचना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. प्रामुख्याने नळ योजनांची दुरूस्ती, विंधन विहीरींची दुरूस्ती, नविन विंधन विहीरी, नविन पाणी पुरवठा योजना व पाणी टंचाईशी संबंधित इतर सर्व बाबींच्या अनुषंगाने उपाययोजनांचा या आराखडयात अंतर्भाव असावा, असेही त्यांनी म्हटले आहे. या आराखडयाला त्वरीत मंजूरी देवून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील सूचना त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, महापौर, उपमहापौर, पंचायत समित्यांचे संवर्ग विकास अधिकारी, सभापती, उपसभापती व संबंधित सर्व पदाधिकाèयांना दिल्या आहेत.



