चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

कार्यकर्ता हाच पक्षाची ताकद – आ.सुधीर मुनगंटीवार….

रैय्यतवारी येथील नागरिकांचा भाजपात प्रवेश

चंद्रपूर शहरातील रैय्यतवारी येथील महिला व पुरुषांनी महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महानगर सचिव उमेश आष्टनकर यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला यावेळी आ.मुनगंटीवार यांनी सांगितले की कार्यकर्ता हाच भारतीय जनता पक्षाची खरी ताकद असून तो सेवाभावी वृत्तीने काम करणारा आहे तसेच सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी तो सदैव तत्पर असतो व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच आज भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर पक्ष प्रवेश कार्यक्रमात महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासनगोट्टवार,सचिव राकेश बोमनवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर पक्ष प्रवेश केलेल्या महिला व पुरुषांमध्ये विद्या बोढेे,इंदिरा बारेकर,शुभांगी बारेकर,सुनील सिंह,संजय बोढे,वैशाली पारशिवे, कलावती तालारी,रामेश्वरी बोईनी,शोभा पारशिवे, व्यंकटेश गप्पाल, उज्वला गप्पाल,नारायण पारशिवे,रत्नमाला नागपुरे,वंदना तोहगावकर,शामराव तोहगावकर यांचा समावेश आहे…

Leave a Reply

Your email address will not be published.