
तेलंगाना येथून नागपूर ला जात असलेला ट्रक प्रसन्न पेट्रोल पंप जवळील वळणावर चंद्रपूर-बायपास मार्गावर तांदळाने भरलेला ट्रक पलटला
◾सुदैवाने जीवित हानी नाही
चंद्रपुर शहरातील बायपास मार्गावर लालपेठ चौकात आज सकाळी 5:30 ते 6:00 वाजताच्या दरम्यान तांदुळाचे बोरे भरून असलेला ट्रक पलटी झाला. याविषयी च्या अधिक माहिती नुसार तेलंगाना येथून नागपूर ला जात असलेला MH 40 Y 3931 क्रमांकाचा ट्रक प्रसन्न पेट्रोल पंप जवळील वळणावर पलटी झाला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी तांदुळाने ट्रक भरला असल्याने ट्रक मधील तांदूळ अस्तव्यस्त पडल्याचे दिसून येत आहे अपघाताची माहिती कळताच रामनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व यासंबंधी चा पुढील तपास सुरू आहे.



