चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

ताडोब्यातील वाघडोह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाचा नैसर्गिकरित्या मृत्यू


चंद्रपूर – जगप्रसिद्ध ताडोब्यातील वाघडोह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला. वाघडोह याला Big Daddy Of Tiger ही म्हणून ओळखल्या जात होते, वाघडोह हा 17 वर्षाचा होता. नुकतेच त्याने सिनाला परिसरात गुराख्याची शिकार केली होती. वाघडोह हा मागील काही दिवसांपासून वनविभागाच्या नजरेत होता, म्हातारा व अशक्त झाल्याने त्यावर वनविभागाची 24 तास नजर होती. आज सिनाला परिसरात त्याचा मृतदेह आढळून आल्याने वन्यप्रेमींना धक्का बसला. जगभरातून वाघडोह ला बघायला पर्यटक येत होते, मात्र त्याच्या मृत्यूने ताडोब्यातील पर्यटनाचं आकर्षण निघून गेलं.

Leave a Reply

Your email address will not be published.