
मूल: तालुक्यातील मुल – सोमनाथ मार्गावरील कोसंबी येथील गुरणुले यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
घटनेची माहिती मुल पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर मृतदेहाची चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटली असून श्री. मार्कंडी रामप्रसाद सोनुले (५०) मुल वार्ड क्रमांक १४ येथील रहिवासी आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबांच्या स्वाधीन करण्यात आले असून मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.



