
वन कर्मचाऱ्यांनी जंगलात सुखरूप सोडले
चंद्रपूर शहरातील जलनगर वार्डात राहणारे भाई सहारे यांच्या घरी चक्क हरण आल्याने एकच खळबळ उडाली. उन्हाळा लागेल्याने पाण्याच्या शोधात हे हरीण जलनगर येथे आले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन कर्माचाऱ्यानी तात्काळ हरणाला तिथून बाहेर काढले.
चंद्रपूर वनविभाग चे RRU यूनिट माहिती मिळताच घटनास्थली दाखल झाले. सदर चितळाला सुखरूप पकडून वनक्षेत्रात निसर्गमुक्त केले. आर आर यू टीममध्ये वनपाल दुपारे, वनपाल पाथर्डे, वनरक्षक भीमराव वनकर, वनरक्षक पठाण, किशोर डांगे यांचा सहभाग होता.
याबाबत वन्यजीव प्रेमी बंडू धोत्रे यांनी सांगितले की, सदर हरण हे रस्ता भटकल्याने शहरी भागात शिरल्याची शक्यता आहे. रस्ता भटकल्याने ही हरण इतरत्र भटकायला लागली. झुडपी किंवा नाल्याच्या मार्गाने हरण शहरात शिरल्याचे ते म्हणाले.



