चंद्रपूर (का.प्र.)दिनांक १४ एप्रिल रोजी अर्थात विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमीत्त चंद्रपूर शहर व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मास्क व डेटॉल साबण वितरीत करण्याचा संकल्प माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला होता. या संकल्पाचा शुभारंभ दिनांक १४ एप्रिल रोजी चंद्रपूर शहरात करण्यात आला. चंद्रपूर शहरात मनपा सदस्य सुभाष कासनगोट्टूवार व संदीप आवारी यांनी तुकूम परिसरात मास्क व डेटॉल साबण चे वितरण केले. गंजवार्ड परिसरात जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, सूरज पेदुलवार, राहूल ताकधट, योगेश कुचनकर, धम्मप्रकाश भस्मे, रोहीत भिसेकर यांनी वितरणात सहभाग घेतला.
महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, मनपा सदस्य राहूल घोटेकर, रवि आसवानी व अन्य नगरसेविकांनी मनपाच्या सफाई कर्मचाèयांना मास्क व साबण वितरीत केले. वितरणाप्रसंगी सोशल डिस्टंसींग पाळण्यात आले. हा उपक्रम १० दिवस राबविण्यात येणार असून पहिल्या दिवशी ३ हजार मास्क व साबण वितरीत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आज सप्तपदी पाळण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी शासन व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.


