चंद्रपुर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात एक धक्कादायक घटना घडली असून बँकेचा निधी जमा करणाऱ्या आर डी एजन्ट वर पाळत ठेवून असलेल्या 2 व्यक्तींनी दुचाकीने येत आर डी एजन्ट च्या डोळ्यांत मिर्ची पावडर टाकत त्यांच्या जवळील 1 लाख 63 हजार रुपयाची लुट केल्याची घटना 25 एप्रिल ला सकाळी 10:00 च्या दरम्यान घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे या संदर्भातील अधिक माहितीनुसार ब्रम्हपूरी शहरातील श्री संजय देवाजी कुळसंगे हें सेंट्रल बँक व आयसिआयसिआय बँकेचे एजन्ट असुन शहरातील लहान-मोठ्या व्यावसायिका कडुन रक्क्म जमा करत असतांना शहरातील एका पेट्रोल पम्प जवळ 2 अज्ञात व्यक्ती दुचाकीं वरून आलेत व त्यानी कुळसंगे यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकत त्यांच्या जवळ असलेले 1 लाख 63 हजार रु रक्कम घेऊन पसार झाले या बाबत कुळसंगे यांनी ब्रम्हपूरी पोलिसात तक्रार दाखल केली असुन पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.
Related Articles
भूस्खलनबाधितांच्या पुनर्वसनासाठी शासकीय भुखंड उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा-सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराला यश
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयातील मौजे घुग्घुस गावात झालेल्या भुस्खलनामुळे बाधित 169 कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान भवनात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय बुधवारी झाला. भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही या बैठकीत पालकमंत्री श्री मुनगंटीवार […]
वर्धा नदीच्या पात्रात आयशर ट्रक कोसळला वाहनचालकाचा मृत्यू
चंद्रपुर :- चंद्रपुर राजूरा मार्गावरील वर्धा नदीच्या पात्रात आयशर ट्रक कोसळला यात वाहनचालकाचा मृत्यू झाला. आवाळपूर येथील सिमेंट कंपनीमधून सिमेंट तुलसी ट्रान्सपोर्ट बल्लारशाह या ट्रान्सपोर्ट कंपनीचे आयशर MH-34-BG 1106 सिमेंट भरून बल्लारपूर मार्गे आलापल्ली जाण्यास निघाले असता दिनांक 27 नोव्हेंबर2022 चे रात्रो वर्धा नदीच्या पुलावर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर ट्रक नदीपात्रात कोसळले यात वाहनचालक […]
जिल्हयातील शेतकरी व आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी पतंजली योगपीठने पुढाकार घ्यावा – आ. सुधीर मुनगंटीवार
हरिद्वार येथे आचार्य बाळकृष्ण यांची घेतली भेट जिल्हयातील शेतकरी तसेच आदिवासी बांधवांनच्या उत्थानासाठी पतंजली योगपिठ हरीद्वार यांनी पुढाकार घ्यावा व चंद्रपूर जिल्हयात विविध उपक्रम राबवावे, अशी विनंती विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आचार्य बाळकृष्ण यांना केली. दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी हरीद्वार येथे पतंजली योगपीठ […]



