चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

वर्धा नदीच्या पात्रात आयशर ट्रक कोसळला वाहनचालकाचा मृत्यू

चंद्रपुर :- चंद्रपुर राजूरा मार्गावरील वर्धा नदीच्या पात्रात आयशर ट्रक कोसळला यात वाहनचालकाचा मृत्यू झाला.  आवाळपूर येथील सिमेंट कंपनीमधून सिमेंट तुलसी ट्रान्सपोर्ट बल्लारशाह या ट्रान्सपोर्ट कंपनीचे आयशर MH-34-BG 1106 सिमेंट भरून बल्लारपूर मार्गे आलापल्ली जाण्यास निघाले असता दिनांक 27 नोव्हेंबर2022 चे रात्रो वर्धा नदीच्या पुलावर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर ट्रक नदीपात्रात कोसळले यात वाहनचालक वैभव याचा मृत्यू झाला.  घटनेची माहिती मिळताच राजूरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतकास नदीतून काढण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.