महाराष्ट्र

मुंबईत कोरोनाचे ९९३ रुग्ण; दिवसभरात १० जण दगावले

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना राजधानी मुंबई करोनाचा केंद्रबिंदू बनला आहे. मुंबईत आज करोनाचे नवीन २१८ रुग्ण आढळले असून १० जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईत आतापर्यंत करोनाची लागण होऊन ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील करोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आज २१८ नवीन रुग्ण आढळल्याने मुंबईत आता ९९३ करोनाबाधीत रुग्ण झाले आहेत (६४ मृत्यू मिळून).

पुण्यात दिवसभरात कोरोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू; ३६ नवे रुग्ण आढळले

पुणे शहर आणि जिल्ह्यात करोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ३६ नवे रुग्ण आढळले त्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या २४५ वर गेली आहे. दरम्यान, आज (शुक्रवार) २ रुग्णांचा उपचारावेळी मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.