
चंद्रपूर, दि. 28 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 165 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 341 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
आज मृत झालेल्यामध्ये सरकार नगर, चंद्रपूर, येथील 72 वर्षीय महिला, बोधली ता. नागभिड येथील 52 वर्षीय पुरूष व आलापल्ली जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 423 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 383, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 341 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 113, चंद्रपूर तालुका 34, बल्लारपूर 15, भद्रावती 16, ब्रम्हपुरी 10, नागभीड 4, सिंदेवाही 12, मूल 9, सावली 4, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 3, राजूरा 36, चिमूर 4, वरोरा 50, कोरपना 19, जीवती 5 व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

