चंद्रपुर

शाळांतील पोषण आहार गरूजूंना द्या-आम.प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर (का.प्र.) कोरोना विषाणूमुळे जगात महामारीचे सावट निर्माण झाले आहे. विषाणूने बधितांची संख्या वाढत आहे. देशात देखील मृत्यूची संख्या वाढत असल्याने शासनाने लॉक डाऊन ची घोषणा केली आहे. त्यामुळे हातावर आणून पानावर खणाèयांचे हाल होत आहे. कोणाचीही उपासमार होऊ नये म्हणून शहरामधील शाळेतील शिल्लक पोषण आहार गरजूंना वाटप करण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे. कोरोना मुळे सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त गरीब व्यक्तींचे हाल होत आहे. त्याच्या हाताला काम नसल्यामुळे त्याला पैसे मिळत नाही . त्यामुळे अन्न धान्य खरेदी कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणाचीही उपासमार होता काम नये, सद्या लॉक डाऊनमुळे शाळा बंद आहेत. शाळेत पोषण आहार शिल्लक आहे. हे शिल्लक अन्न गरजूंना वाटप करण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.