चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मोदीजींचे कार्य सोशल मिडीया कार्यकत्र्यांनी घरोघरी पोहचवावे – हंसराज अहीर

आपल्या उद्घाटकीय भाषणात हंसराज अहीर यांनी सोशल मिडीयाचे महत्व विशद करीत प्रत्येक कार्यकर्त्यांनी  यात तज्ज्ञ बनावे असे आवाहन केले. या देशात लोकशाही असल्याने प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांचा  संबंध राजकारणाशी आहे. देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे आपण सदस्य आहात ही सन्मान व गौरवाची बाब आहे. त्यामुळे आपली जबाबदारी ओळखून सर्वांना मोदींजीच्या राष्ट्रसमर्पित विकास कार्याला जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करायची असल्याने सोशल मिडीया इंन्फल्यूएसंरनी हे कार्य स्वताला झोकुन देत करावे.
प्रधानमंत्री नरेेंद्र मोदींनी या देशात आतंक, घुसखोरीवर नियंत्रण मिळवित देशाच्या सर्वाग विकासात अभूतपूर्व कार्य केले आहे. सिमा सुरंक्षीत आहे. काल पर्यंत नाॅर्थ-ईस्ट, काश्मिर पेटत होता प्रधानमंत्र्यांनी या ठिकांणी शांतता प्रस्थापित करीत लोकशाहीची बिजे रोवली. अनेक ज्वलंत प्रश्न दूरदृष्टी ठेवुन सोडवीले 75 वर्ष राज केलेल्यांनी जे केले नाही ते मोदींजीनी 9 वर्षात करुन दाखविले यावेळी अहीर यांनी बांग्लादेश-भारत सिमा व अनेक बाबींवर मोदींनी घेतलेल्या निर्णयाचा परामर्ष घेतला प.बंगाल व अन्य राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबत सुरु असलेल्या गंभीर बाबींवरसुध्दा त्यांनी भाष्य केले सोशल मिडीयाच्या माध्यमातून केंद्र, राज्य व स्थानिक पातळीवरील पक्षाच्या लोकप्रतिनिधींचे कार्य, विकास लोकसभा क्षेत्रातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी स्वतःला झोकुन द्यावे असे आवाहन केले.
या प्रसंगी देवराव भोंगळे, लक्की चावला, डाॅ. गुलवाडे यांनी सोशल मिडीयाचे महत्व, मिडीया इंन्फल्युएंसरची जबाबदारी, मोदी राजवटीतील लोकाभिमुख विकास कामे आदी बाबींवर समर्पक मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन सौ. अंजली घोटेकर यांनी केले या सोशल मिडीया इंन्फल्युएंसर मिटला चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील सोशल मिडीया संयोजक, सहसंयोजक, भाजपा व विविध आघाड्यांचे पदाधिकारी, भाजपस्नेही नागरिक व बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.