
चंद्रपूर, दि.22 एप्रिल: चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 922 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
तर 1537 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. नागरीकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखण्े या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. स्वतःची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील नागरिकांनी जवळच्या केंद्रावरुन कोरोनाची लस घ्यावी. व प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाध्किारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
922 कोरोना वर मात
1537 नविन पाॅझिटिव्ह
28 बाधितांचा कोरोना ने मृत्यू


