
आधीच पावसामुळे व त्यातल्यात्यात पुरामुळे बेजार असलेल्या नागरिकांना चोरांचा वार सहन करावा लागतो की काय अशी स्थिती चंद्रपूर शहरात निर्माण झाली असुन दुकानात झालेल्या चोरीची सकाळीच तक्रार द्यायला गेलेल्या पिडीत व्यक्तीला तक्रार द्यायला दहा वाजल्या नंतर येण्याचे आदेश शहर पोलिसांनी दिल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार नुसार शहरातील पठाणपुरा मार्गावर येरणे ह्यांचे सागर किराणा व मिलिंद गंपावार ह्यांचे भालचंद्र मेडिकल असुन चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास ह्या दोन्ही दुकानांचे शटर वाकवून चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. सागर किराणा चे संचालक येरणे हे सकाळीच आपले दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. मात्र त्यांनी कसेबसे शटर उघडुन दुकानात जाऊन बघितले असता त्यांच्या दुकानातील रक्कम चोरीला गेल्याचे प्रथादर्षणी लक्षात आले. वृत्त लिहीत असेपर्यंत भालचंद्र मेडिकल चे संचालक घटनास्थळी उपस्थित होते मात्र पोलीस आल्यानंतर दुकान उघडणार असल्याने त्यांच्याकडील काय चोरीला गेले हे कळू शकले नाही.




