
चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. शहर,गाव, तालुका यांच्या प्रत्येकाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची काटेकोर तपासणी केली जात आहे. यातील सर्व यंत्रणेने अशा परिस्थितीत अतिशय गांभीर्याने आपापली जबाबदारी पार पाडावी. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. तरीही बाहेर पडला तर आपसात सामाजिक अंतर पाळावे. पुढील १० दिवस आणखी थोडी झळ सोसावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही या तालुक्यांमध्ये १५ दिवस पुरेल इतक्या अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटपकेले. तर वरोरा परिसरात उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्यामार्फत परराज्यातील ४५ कुटुंबांना १५ दिवसांचे अन्नधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्याच्या १५ ही तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी उघडण्यात आलेल्या निवारा गृहात ५ हजारावर विविध राज्यातील व अन्य जिल्ह्यातील नागरिक मुक्कामी असून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येत आहे. दरम्यान,आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदेशात प्रवास करून आलेल्या फक्त ३ व्यक्तींना निगराणीत सध्या ठेवण्यात आले आहे.आतापर्यंत १४ दिवस होम कॉरेन्टाईनचा अवधी २०१ नागरिकांनी पूर्ण केला आहे.
२०४ नागरिकांची आतापर्यंत नोंद करण्यात आली आहे.ग्रामीण भागात आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरात जाऊन येणाèया नागरिकांची माहिती घेत आहे. गेल्या १७ फेब्रुवारी ते २१ मार्च पर्यंत ज्यांनी बाहेरगावी प्रवास केला अशा सर्वांची नोंद घेतली जात आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी देखील केली जात आहे. याशिवाय जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याधिकारी कार्यालयामध्ये गठीत करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षांमधून देखील १० वेगळ्या फोन लाईन्स मार्फत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना दूरध्वनी करून त्यांच्या आरोग्याविषयी माहिती घेतली जात आहे.
नागरिकांनी अशा संदर्भातील तपासणी साठी येणाèया दूरध्वनीला व कर्मचाèयांना योग्य प्रतिसाद द्यावा. आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी ही चौकशी होत असून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. महानगरपालिका मार्फत निराश्रित, निराधार, बेघर व विमनस्क व्यक्तींना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तयार भोजनाचे वितरण होत आहे. यासोबतचमहानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी ज्येष्ठ नागरिक, निराधार व दिव्यांगांना त्यांच्या पैशाने घरपोच किराणा व जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी एका टिमचे गठण केले आहे. त्यांच्यामार्फत घरपोच ही सेवा देण्यात येत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांमध्ये स्वस्त धान्य दुकानांमधून नागरिकांना १ महिन्याचे रेशन वाटप सुरू झाले आहे.
आपल्या रेशन कार्डवर २ व ३ रुपये दराने अन्य अन्नधान्य मिळत असताना प्रत्येक अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभाथ्र्यांना प्रती मानसी ५ किलो तांदूळ मोफत वाटप देखील सुरू झाले आहे. दरम्यान,पुढील १० दिवस सुरू राहणाèया लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी आतापर्यंत पाळलेले शिस्त कायम ठेवावी.चंद्रपूर शहरांमध्ये सामाजिक अंतर पाळून नागरिकांनी कोरोना आजाराचा प्रतिबंध करावा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असली तरी घरातील एकाच नागरिकाने आठवड्याभरातून एकदाच बाहेर पडून, हे साहित्य घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकाèयांनी केले आहे.रस्त्यावरील दुचाकी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी देखील त्यांनी निर्देशित केले असून पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचेही आवाहन केले आहे.
