चंद्रपूर, (का.प्र): 2 फेब्रुवारी : शहरातील प्रमुख महात्मा गांधी मार्गावर असलेल्या आझाद बागेत सकाळी फिरायला पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी मंगळवारी (दि.2) सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुचाकीने आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला. महिलेच्या फिर्यादीनुसार एक लाख रुपये किंमतीची सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा चंद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.शहरात चोरीचे हे प्रकार नित्यनेमाने सुरुच आहे. दररोज शहरात कोणत्यातरी एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाप्रकारचा गुन्हा दाखल होत आहे. दररोज प्रमाणे सकाळी फिरायला पायी जात असलेल्या फिर्यादी सुनीता सुधाकरराव गंपावार (69, रा. पठाणपुरा वार्ड, चंद्रपूर) यांच्या समोरुन मुख्य मार्गावर असलेल्या बैंक ऑफ इंडिया समोर दुचाकीने आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवरून पलायन केले. या दरम्यान श्रीमती गंपावार खाली पडले व त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत देखील झाली आहे.
Related Articles
माजी नगराध्यक्ष बिताताई रामटेके यांचे यजमान अॅड. घनश्याम रामटेके यांचे 29 मे ला दु:खद निधन.
औरंगाबाद मिलींद महाविद्यालय येथे शिक्षण, साहाजिकच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक चळवळीत सहभाग; विद्यार्थी प्रिय शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर वकिलीची प्रँकटिस. बुध्द धम्माचे गाढे अभ्यासक (तिपिटक) भदन्त सुरई ससाई बुध्दिस्ट काॅलेजचे उपप्राचार्य, चंद्रपूर मधिल ” वेळुवन बुध्द विहार ” चे अध्यक्ष, मनमिळाऊ; केव्हाही मदतीचा हात पुढे करणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड लुप्त झाल.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 46 पॉझिटिव्ह
चंद्रपूर, दि. 27 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 46 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 604 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 937 झाली आहे. सध्या 269 बाधितांवर उपचार सुरू आहेत. […]
30 जुलैला चंद्रपूरात महारक्तदान यज्ञ
पालकमंत्र्याच्या जन्मदिनाचे औचित्य ना.सुधीर मुनगंटीवार मित्र परिवाराचा पुढाकार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महानगरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन ‘ना.सुधीर मुनगंटीवार मित्र परिवार’ तर्फे 30 जुलैला करण्यात आले आले आहे. एकूण 5000 युनिट रक्तदान करण्याचा संकल्प या मित्र परिवाराने केला आहे. सकाळी 10 ते 3 दरम्यान महानगरातील प्रत्येक मंडळात (पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण […]


