पालकमंत्र्याच्या जन्मदिनाचे औचित्य
ना.सुधीर मुनगंटीवार मित्र परिवाराचा पुढाकार
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महानगरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन ‘ना.सुधीर मुनगंटीवार मित्र परिवार’ तर्फे 30 जुलैला करण्यात आले आले आहे. एकूण 5000 युनिट रक्तदान करण्याचा संकल्प या मित्र परिवाराने केला आहे. सकाळी 10 ते 3 दरम्यान महानगरातील प्रत्येक मंडळात (पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व मध्य) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सुधीर मुनगंटीवारांवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरीकांनी, रक्तदान करून या प्रेमाला जोड द्यावी, असे आवाहन ना.सुधीर मुनगंटीवार मित्र परिवारचे संजोजक डॉ.मंगेश गुलवाडे यांनी केले आहे.
चला रक्तदान करूया,
समाजाचे ऋण फेडूया…असे ब्रीदवाक्य घेऊन यशस्वीतेसाठी हरीश शर्मा, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, तुषार सोम, राखी कंचर्लावार, सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, प्रकाश धारणे, विशाल निंबाळकर, अंजली घोटेकर, राहुल पावडे, संजय कंचर्लावार, संदीप आवारी, रवी आसवानी, अजय सरकार, सचिन कोतपल्लीवार, विठ्ठल डुकरे, रवी लोणकर आदी मंडळी परिश्रम घेत आहेत.
रक्तदात्यांच्या सोयीसाठी येथे होणार रक्तदान
प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान करता यावे, म्हणून आयोजकांनी समाज भवन बंगाली कॅम्प, महेश भवन तुकुम, रविदास महाराज सभागृह जुनोना, शिवपार्वती सभागृह आकाशवाणी, गिरनार चौक, वन अकादमी, मोहसीन भाई जवेरी कॉलेज, माता कन्यका सभागृह, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे आयोजन केले आहे.



