चंद्रपुर

रस्त्यावरील गर्दी कमी करा; घरातील एकानेच आवश्यकता असल्यास बाहेर पडा -जिल्हाधिकारी डॉ.खेमनार

चंद्रपूर (का.प्र.) कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या संघर्षामध्ये शेवटच्या टप्प्यात आपण सगळे आलो असून आता १४ एप्रिल पर्यंत शक्यतो घराबाहेर पडणारच नाही, अशा पद्धतीने सर्व नागरिकांनी जबाबदारीचे वर्तन करावे. घरातील एकटाच सुदृढ व्यक्तीने गरज असेल तरच बाहेर पडावे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना या काळात बाहेर पडावे लागू नये यासाठी महानगर पालिके मार्फत यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेचा वापर त्यांची देखभाल करणाèया मदत करणाèया नागरिकांनी करावा. जिल्ह्यात अद्याप एकही नागरिक पॉझिटिव्ह नाही. त्यामुळे सर्व जिल्हा बंद करण्यात आला असून नागरिकांनी यामध्ये सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले ,महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह आज संपूर्ण शहरांमध्ये फेरफटका मारला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या कंटड्ढोल रूम मध्ये बसून जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यांमध्ये सध्या ४० शेल्टर होम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास ३७०० अन्य राज्यातील नागरिक आहेत. या सर्वांच्या खान पानाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यांनी कुठेही या काळात जाण्याचा प्रयत्न करू नये. असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. यासोबतच अन्य राज्यात थांबलेल्या चंद्रपूरच्या नागरिकांनी देखील १४ तारखेपर्यंत जिल्ह्यांमध्ये प्रवेश करू नये,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येकाने आहे तिथेच थांबावे. आवश्यक सुविधांसाठी सरकारी यंत्रणेकडे संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आरोग्य यंत्रणेकडून आलेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या साथरोग विभागाने विदेशात गेले असल्याची माहिती असणाèया ७२ चंद्रपूरकर नागरिकांची माहिती दिली आहे.मात्र यापैकी बहुतेक नागरिक हे बाहेर जिल्ह्यामध्ये आहेत. या सर्वांची संपर्क साधण्यात आला आहे. ज्यांनी विदेश दौरा केला आहे, अशा २०४ नागरिकांची आतापर्यंत नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी १५२ नागरिकांनी १४ दिवसांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण केले आहे. सध्या १४ दिवसांच्या कॉरेन्टाईनमध्ये असणाèया रुग्णांची संख्या ५२ आहे. काल तपासणीसाठी पाठवलेल्या १३ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोणतीही माहिती न लपविता आरोग्य विभागाच्या कर्मचाèयांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.