उपमूख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा चंद्रपूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना दिक्षा दिली. त्यामूळे चंद्रपूरशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते जूळल्या गेले असून याची ईतिहासातही दखल घेण्यात आली आहे. मात्र त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारे एकही वास्तू चंद्रपूरात नाही. त्यामुळे युवा पिढीला त्यांच्या देशासाठीच्या योगदानाची माहिती देणारे संविधानारावर आधारीत अद्यावत संविधान भवन चंद्रपूरात उभारण्यात यावे अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी केली असून सदर मागणीचे पत्र उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थ – नियोजन मंत्री अजितदादा पवार यांना दिले आहे.काल मंगळवारी मुंबई येथील मंत्रालयात आ. जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री अजीतपवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चंद्रपूरात संविधानाच्या माहितीवर आधारीत संविधान भवन निर्मीतीच्या मागणी संदर्भात चर्चा केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली या ठिकाणी बौध्द धम्माची दिक्षा दिली. त्यामुळे येथील पावण दिक्षाभूमीवर भारतासह जगाच्या कानाकोप-यातुन लाखो बौद्ध उपासक – उपासिका, भिक्षू संघ मोठ्या संख्येने येतात परंतु आज इतके वर्ष लोटूनही या दिक्षाभूमीचा अपेक्षीत असा विकास झालेला नाही. त्यामुळे याच्या विकासासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची माहिती आणि पर्यायाणे संविधानीक हक्कांबाबत चंद्रपूरातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच बाहेरुन येणा-या नागरिकांनाही डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या विषयी जाणून घेणे सहज व्हावे याकरिता चंद्रपूर शहरात संविधानावर आधारित संपूर्ण माहिती असलेले अद्यावत संविधान भवन उभारण्यात यावे अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी ना. अजीतदादा पवार यांना केली आहे. तसे पत्रही आ. जोरगेवार यांच्या वतीने त्यांना देण्यात आले आहे. अजित पवार यांनीही यावेळी आ. जोरगेवार यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या कामाबद्दल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून माहिती घेवून सदर मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
Related Articles
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीतून तीन कोटीचा दंड वसूल – जिल्हाधिकारी
*हल्ल्या घाटावरील अवैध रेती वाहतूकीवर भरारी पथकाचा छापा चंद्रपूर, दि. 17 नोव्हेंबर: अवैध खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात सन 2020-21 मध्ये आतापर्यंत एकूण 330 प्रकरणात रुपये तीन कोटी 58 हजार 480 दंड वसूल करण्यात येवून 13 व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात जिल्हा भरारी पथकाने एकूण 20 प्रकरणात रु. 23 लाख […]
जिल्ह्यात डॉ. भास्कर सोनारकर यांना सर्वप्रथम कोविशिल्ड लसीचा डोज
*कोरानाविरूद्ध लढाईत जिल्हा प्रशासनाचे काम कौतुकास्पद – जि.प.अध्यक्षा गुरनुले चंद्रपूर, दि. 16 जानेवारी : चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना लसीकरण केंद्रावर आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोज देण्यात आला व जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची सुरूवात करण्यात आली.यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय […]
महीणाभरापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
चंद्रपूर : महीणाभरापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह चिवंडा जंगलात आढळून आला. शिवा विठू आत्राम ( वय 45 ) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहीतीनुसार, जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या चीवंडा या गावातील शिवा विठू आत्राम हा इसम 16 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घरातून निघून गेला. कुटूंबियांनी शिवा […]



