राजुरा (ता.प्र):: जिल्ह्यात कोरोना चे रुग्ण वाढत आहे व मृत्यू ची संख्या वाढत आहे त्यामुळे चंद्रपुर व बल्लारपूर येथे चार दिवसांचे व्यापारांनी व प्रशासनाने कडकडीत बंद पाळण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील रुग्ण संख्या अधिक क्षेत्रातील अनेक तालुका ते गावपातळीवर स्वयंस्पुर्त बंद पाळण्यात येत आहे. शासन व प्रशासन ला सहकार्य म्हणून जनता कर्फ्यू चे आयोजन राजुरा शहर व्यापारी असोसिएशन ने केले आहे.दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे शहरातील दोन व्यक्ती कोरोना ने मृत्यू झाले आहे. राजूराच्या प्रथम नागरिक अरुण धोटे सहित काही प्रतिष्ठित व्यापारी सुद्धा संक्रमित झाले आहे. त्यामुळे संक्रमण व रुग्णाची संख्या कमी करण्यासाठी कोरोणा विषाणूची साकळी तोडणे गरजेचे आहे.हा उद्देश डोळ्या समोर ठेवून राजुरा शहरातील व्यापारी असोसिएशन व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक आज उपविभागीय कार्यलय राजुरा येथे तालुका प्रशासकीय अधिकारी, ठाणेदार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शहरात बुधवार दि. 16 सप्टेंबर ते रविवार दि. 20 सप्टेंबर पर्यंत स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.शासन व प्रशासनाला सहकार्य म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर जनता कर्फ्यू चार दिवसांचा असुन या कालावधीत सर्व दवाखाने, औषधांचे दुकाने, बॅंक व दुधवितरण व्यवस्था सुरु राहणार असून सर्व किराणा दुकान, भाजीपाला व फ्रूट चे दुकाने, पान टपरी, चाय चे दुकाने, फुटपाथवरील दुकाने व इतर सर्व दुकाने बंद राहणार आहे.
Related Articles
प्रा प्रशांत खैरे यांच्या कवितेस राज्यस्तरीय वामनदादा कर्डक काव्य गौरव शताब्दी पुरस्कार
गडचांदूर- नागपूर(मोरभवन)येथे वामनदादा कर्डक साहित्य प्रबोधनी,नागपूर द्वारा प्रा. प्रशांत खैरे यांना त्यांच्या कवितेसाठी “राज्यस्तरीय वामनदादा कर्डक काव्य गौरव शताब्दी पुरस्काराने”मा. प्रमोद वाळके सर (प्रसिद्ध साहित्यिक कवी तथा गजलकार )यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, रोख रक्कम, पुस्तके देऊन गौरवण्यात आले.यावेळी विचार मंचावर प्रा. डॉ. मनोहर नाईक (प्रसिद्ध साहित्यिक) मा.प्रसेनजीत गायकवाड( प्रसिद्ध साहित्यिक) प्रा. डॉ.प्रकाश राठोड (प्रसिद्ध साहित्यिक) मा.शालिक […]
आजचे कोरोना अपडेट
चंद्रपूर, दि. 15 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 1 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, […]
चंद्रपूर तालुक्याचा कापूस उत्पादक तालुक्यांच्या यादीत समावेश
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला यश आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला यश आले असुन कापूस उत्पादक तालुक्यांच्या यादीत आता चंद्रपूर तालुक्याच्या समावेश करण्यात आला आहे. तसा शासन निर्णय १८ नोव्हेंबर २०२२ ला सहकार पणन व वस्त्र विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता चंद्रपूरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. वस्त्र उद्योग धोरण राबविण्यासाठी […]



