चंद्रपुर जिल्हा

ब्रह्मपुरी तालुक्यातील पूर परिस्थिती बाबत पालकमंत्र्यांकडून आढावा

पूरग्रस्त भागातील गावांना 5 कोटी रुपयाची तात्काळ मदत;

प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला 10 हजार रुपयांची मदत मिळणार

चंद्रपूर दि.1 सप्टेंबर : ब्रह्मपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावांना पाच कोटी रुपयांची तात्काळ मदत देण्यासोबतच प्रत्येकी पूरग्रस्त कुटुंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन  मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.