घुग्घुस (प्रति): येथुन जवळच असलेल्या शेनगाव येथील राहणा-या सौ. वंदना परशुराम आत्राम (३५) हिने आज मंगळवारला सकाळी ६ वाजता दरम्यान राहते घरीच गळफास लावुन आत्महत्या केली. गावातील नागरिकांना हि माहिती मिळताच घुग्घुस पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आले घुग्घुस पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी चंद्रपुर येथे पाठविले आहे घुग्घुस पोलीसांनी मर्ग दाखल केला आहे. आत्महत्येचे कारण कळु शकले नाही पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
Related Articles
ओबीसी बांधवांच्या न्यायासाठी लढा देण्यास मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे – हंसराज अहिर यांचे आवाहन.
#माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील सरकारने ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक व संवैधानिक हक्कासाठी भरीव कार्य केले असून हे सरकार ओबीसींचे तारणहार आहे. भाजपा ओबीसी मोर्चा ओबीसींच्या न्याय अधिकारासाठी लढा देणारे समर्पित संघटन असून ओबीसी बांधवांच्या न्यायासाठी प्रखर लढा देण्यास या मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय […]
आकापूर ग्रामपंचायत गावबंदी करणारी मुल तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत
मूल (ता.प्र) मूल तालुक्यातील आकापूर हे गाव गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावंर मूल पासुन सहा कि.मी.अंतरावर असुन कोरोना विषाणूची लागन गावातच येऊ नये यासाठी गावात बाहेरच्या लोेकांना प्रवेशबंदी घालण्यांत आल्याचा निर्णय ग्रामपंचायंतीने घेतला असुन कोरोना विषाणूंला दुर ठेवण्यासाठी तालुक्याती इतरही ग्रामपंचायतीने असा एकमेव निर्णय घ्यावा आणि प्रशासनाला व शासनाला सहकार्य करावे असा मौलिक सल्ला आकापूर येथील सरपंच, […]
शाळा न्यायाधिकरण कायमस्वरूपी चंद्रपूरलाच ठेवा….
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे मागणी… चंद्रपूर जिल्ह्यात सन १९९८ पासून सुरु असलेल्या शाळा न्यायाधिकरणमध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व वर्धा या पाच जिल्ह्याचा समावेश होता. २० मे २०२२ नुसार शाळा न्यायाधिकरण पुनर्रचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांनी अधिसूचना प्रसिद्ध करून चंद्रपूर येथील शाळा न्यायाधिकरण कार्यालय बंद […]



