चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चेक निंबाळा गावात एका फार्म हाऊसवर सुगंधित तंबाखू असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फार्म हाऊसवर धाड टाकली असता जवळपास ५० लाखांचा सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.
Related Articles
सलुन पार्लर आता दर सोमवारी बंद
* कोरोना पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांचे आदेश चंद्रपूर दि.२७ , कोरोना पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हयातील सलुन, स्पा, बार्बर शॉप, ब्युटीपार्लर, केस कर्तनालय इ. दुकाने व आस्थापना आता दर सोमवारी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी जिल्ह्यातील सर्व सलुन/पार्लर सप्ताहातील एक दिवस पुर्णत: बंद ठेऊन, दुकान/आस्थापना व त्यातील सर्व साहित्यांची साफसफाई करुन […]
दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण देण्यात यावे -आ.सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर (का.प्र.)कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउन मुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा जो पेपर राहिला आहे , तो न घेता विद्याथ्र्यांना सरासरी गुण देण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड़ यांच्याकड़े केली आहे. सदर प्रकरणी येत्या ४ दिवसात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन […]
मेंढपाळांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील – वनमंत्री मुनगंटीवार
चंद्रपूर : राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांबाबत राज्य शासन संवेदनशीलतेने विचार करीत असून लवकरच पुन्हा बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळ बांधवांना दिले. मेंढ्यासाठी चराई कुरण राखीव करणेबाबत व मेंढपाळांच्या इतर समस्यांबाबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संजय गायकवाड, वन विभागाचे सचिव वेणुगोपाल […]



