चंद्रपुर

*चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २४३*

*शुक्रवारी एकाच दिवशी २५ कोरोना बाधित*
*बिहारमधून आलेल्या १२ कामगारांचा समावेश*
चंद्रपूर(का. प्र ):,दि. १७ जुलै: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधिताची काल दुपारी २२८ असणारी संख्या रात्री उशिरा आणखी १५ बाधितांची भर पडल्यामुळे २४३ झाली आहे. बुधवारी २१८ असणारी ही संख्या २४ तासात २५ बाधित पुढे आल्याने २४३ झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर व भद्रावती या शहरात लॉक डाऊन सुरू केल्यानंतर चाचण्या वाढविण्यात आल्या होत्या. आता दहा दिवसांसाठी चंद्रपूर शहर देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविले असून आरोग्यसेतूचा वापर व अॅन्टीजेन चाचणीमुळे बाधितांची संख्या आणखी वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.शुक्रवार दिनांक १८ जुलै रोजी रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत आलेल्या पंधरा बाधितांमध्ये चंद्रपूर महानगर क्षेत्रातील एक, सिंदेवाही ग्रामीण भागातील एक, मूल ग्रामीण भागातील एक, आणि अन्य राज्यातील १२ बाधितांचा समावेश आहे. यापूर्वी १७ जन जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे ११ जवान व ६ जन अन्य राज्याचे रहिवासी होते. बिहारमधील आता १२ जणांची भर पडल्याने अन्य राज्यातील बाधितांची संख्या २९ झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published.