चंद्रपुर

ताडोबात आजपासून पर्यटनाला सुरवात

चंद्रपूर(का.प्र.) :येथील जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात लॉकडाऊन पासून पयर्टन बंद होते. अखेर आज तीन महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर आज १ जुलै पासून व्याघ्र पर्यटनास सुरवात करण्यात आली आहे. आज सकाळी आगरझरी व कोलारा येथून ५ जिप्सी पर्यटकांना घेऊन व्याघ्र भ्रमंतीसाठी जंगलात रवाना करण्यात आल्या. त्यापूर्वी संपूर्ण जिप्सी वाहनावर सॅनिटायजर फवारण्यात आले व सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.