बल्लारपूर (प्रति):बल्लारपूर विसापूर पावर हाऊस जवळ माहामार्गावर ट्रक क्र.AP 01W- 4422 उभा असलेल्या ट्रक ना धडक मोटरसायकलने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू दुसरा गंभीर जखमी झाला. मोटर सायकल चंद्रपूर कडे जाताना मोटरसायकल क्रमांक. MH 34 – BP 2927 उभा असलेला ट्रक ना धडक दिली. घटना सकाळी 7:30 ते 8:00 चे दरम्यान या अपघातात सुमित विनोद पुरी (16) रा. कन्नम नगर वार्ड, बल्लारपूर याचं लगेच अपघातात मृत्यू झाला दुसरा गुड्डू मेश्राम (16) रा. कन्नम नगर वार्ड, बल्लारपूर याला गंभीर जखमी असल्या मुळे चंद्रपूर रुग्णालयात रेफर करण्यात आले. हि .माहीती बल्लारपूर पोलीस स्टेशन ला मिळताच पोलीस घटना स्थळी पोलीस पोचले. पुढील तपास बल्लारपूर पोलिस करत आहे.
Related Articles
न. प. राजुरा येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण.
राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते नगर परिषद राजुरा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. यात महाराष्ट्र अग्निशमन अभियान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत नगरपरिषद राजुरा येथे अग्निशमन स्टेशन परिसरात अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांकरिता क्वार्टर च्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे, अंदाजित किंमत १ कोटी ८ लक्ष, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत इंदिरानगर वार्ड नंबर १७ येथे […]
मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे ३१ मे पर्यंत करा- मुख्यमंत्र्यांचे निर्देश
जिवती :- येत्या पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती उद्भभवू नये म्हणून सर्व नालेसफाईची कामे संबधीत यंत्रणांनी ३१ मे पर्यत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील शांतीनगर या भागाला लागून असलेल्या मुख्य नाल्याची सफाई संबधीत प्रशासनाने करावी अशी मागणी शांतीनगर वासीय करीत आहेत. पावसाळा सुरू होत असून शहरातील मान्सूनपूर्व कामे बाकी […]
मनपाची ५ प्रतिष्ठानांवर कारवाई कारवाईत १० हजारांचा दंड वसूल
चंद्रपूर, ता. ११ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा दुपारी ११ नंतर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. ११) मनपाने चंद्रपूर शहरातील झोन क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या ५ […]


