वरोरा(ता.प्र): नागपूरवरून तीन युवक चारचाकी गाडीने येत असतांना समोरचे चाक अचानक निघाल्याने घटनास्थळी दोघांना मृत्यू झाला. तर एका जणाचा ग्रामीणरुग्णालयात वरोरा येथे नेत असतांना वाटेत मृत्यू झाला. रविवार दिनांक २१ जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास नागपूरवरून सिद्धेश पंढरीनाथ साळगावकर (३६) सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग,सुनीलकुमार अग्रवाल (४०) राजस्थानचे पण हल्ली मुक्काम चंद्रपूर व दशरथ. व्ही. पट्टे (४०) चंद्रपूर हे तिघे जण चंद्रपूरचे होते. मांगली गावाजवळ ड्रायव्हरच्या बाजूचे चाक अचानक निघाले त्यामुळे कार वेगाने असल्यामुळे समोरच्या झाडावर आदळली त्यात दोघांचा जागीच व एकाच वरोरा ग्रामीण रुग्णालयात नेतांना वाटेत मृत्यू झाला.
Related Articles
बाबुपेठ परिसरातील रेल्वे उड्डाणपुलासाठी ५.२६ कोटी रू. निधी मंजूर
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्यांना यश भाजपा पदाधिका-यांनी नागरिकांसह साजरा केला जल्लोष. चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील रेल्वे उड्डाणपुलासाठी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दिनांक २६ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये ५.२६ कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला. यामुळे आनंदीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाबुपेठवासीय नागरिकांसह दिनांक २६ मे रोजी सायंकाळी जल्लोष […]
मामा तलावाच्या खोलीकरणाच्या कामा दरम्यान अकराव्या शतकातील यादवकालीन आढळले शिल्प
चंद्रपूर : जिल्हाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आजही उभ्या आहेत. जिल्हाचा इतिहासात आज अधिक भर पडली. जिल्ह्यातील भेजगाव येथिल मामा तलावाचा खोलीकरणाचा कामा दरम्यान अकराव्या शतकातील यादवकालीन शिल्प आढळले आहे. या तलावाचा पाळीवर जिर्ण मात्र देखणे हेमाडपंथीय मंदीर आहे. या शिल्पात एका रेड्यावर अथवा मेंढ्यावर गदाधारी पुरूष मांडी घालून बसलेला दिसतो. […]
आजचे कोरोना अपडेट
जिल्ह्यात 26 कोरोनामुक्त, 23 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु चंद्रपूर,दि. 3 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 26 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 23 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 1 बाधिताचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 23 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 6, चंद्रपूर […]



