चंद्रपूर(का.प्र ):दिनांक १०. ०६ . २०२० रोजी मोहर्ली (बफर )वनपरिक्षेत्रातील सीतारामपेठ बीटातील संरक्षित वन कक्ष क्र. ९५६ च्या नाल्यामध्ये वाघिणीचा मृतदेह आढळून आला. तसेच त्या भागाची अधिकची पाहणी केली असता. १४.०६. २०२० रोजी आणखी वाघिणीच्या पिल्लाचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. प्राथमिक दृष्ट्या वाघीण व दोन पिल्लांचा मृत्यू विषप्रयोगमुळे झाल्याच्या संशयावरून तपास केला असता. लगतच्या कोंडेगाव गावातील तीन आरोपी नामे १)सूर्यभान गोविंद ठाकरे वय-६० २)श्रावण श्रीराम मडावी वय -४७ ३)नरेंद्र पुंडलिक दडमल वय -४९ यांना सदर गुन्हच्या अनुषंगाने चौकशी साठी ताब्यात घेतले असून चौकशी केली असता त्यांनी गुहन्याने कबुली दिली. सर्व आरोपी हे कोंडेगाव शेतशिवारात मोह दारू काढण्याचे काम करतात दारू काढून निघालेल्या सडव्यावर डुक्कर मारण्याच्या उद्धेशाने थिमेट टाकले सदर परिसरात वाघाचा वावर असल्याने वाघा पासून आपला दारूचा धंदा बंद पडू नये मेलेल्या डुकरावरती आणखी विष प्रयोग करून वाघीण व दोन पिल्ले यांना मारण्यात आले. आरोपीचे ब्यान नोंदवून अटक करण्यात आली पुढील तपास सुरु आहे.
Related Articles
चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन मध्ये : जिल्हाधिकारी डाँ. कुणाल खेमणार
चंद्रपूर (का .प्र ):जिल्यामध्ये आज पर्यंत एकही कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण नाही नागपूर येथे चंद्रपूर मूळ नागरिक असणारे विदेशातील दोन नागरिक पॉझीटिव्ह आले होते ते नागरिक धोक्याबाहेर असून सध्या नागपूर येथे उपचार घेत आहे. जिल्यामध्ये एकही पॉझीटिव्ह रुग्ण नाही. अद्याप तसा कोणताही अहवाल कोणाचा आलेला नाही. राज्य शासनाच्या काही वेब साईटवर नागपूर मध्ये असलेल्या या रुग्णाचा […]
अडेगाव येथील युवकांचे अनोखे बेमुदत खड्यात बसून उपोषण सुरु
यवतमाळ जिल्ह्यातील टोकावरील झरी-जामनी तालुक्यातील गौनखनिजाने व्यापलेले अडेगाव खडकी – गणेशपुर या परिसरात मोठ्या खदानी आहे . या खदानीच्या मोठ्या वाहतूकी ही खडकी मार्गे अडेगाव या रस्त्याणी चालत असतात .या परिसरात जगती मिनरल्स , ईशान मिनरल्स , सूर्या मिनरल्स , गुंडावार मिनरल्स , मोनेट इसपात व इतर गिट्टी खदानीचे मोठी वाहतूक ही अडेगाव रस्त्याणी जाते […]
वन विभागाच्या सर्व सेवा एका छताखाली देण्यासाठी “वन सेवा केंद्र” सुरू करण्यात येणार — वने मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : सामान्य नागरिकांना “आपले सरकार”च्या माध्यमातून अनेक सेवा सुविधा उपलब्ध होत असतात. याच धर्तीवर वन विभागामार्फत केंद्राच्या, राज्य शासनाच्या सेवा देण्यासाठी “वन सेवा केंद्र” सुरू करून यामार्फत वन विभागाच्या सर्व सेवा एका छताखाली देण्यात याव्यात, असे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिले. वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान […]


