चंद्रपूर (का.प्र) महाराष्ट्रात व्यापारी केंद्र सरकारच्या हमी भावानुसार कापूस खरेदी न करता शेतकऱ्यांची लूट करत असल्याने सीसीआय द्वारे खरेदी कापूस केला जातो यावर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे नियंत्रण ठेवले जाते परंतु काही कृषि उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत होते टोकन पद्धतीशिवाय कापूस खरेदी केला जात नव्हता टोकन करिता अडवणूक करून पैसे वसुलीचा आरोप होत होता काही ठिकाणी अडत्यांचा कापूस खरेदीला प्राधान्य दिले जात होते प्रत्येक गाडीमागे ग्रेडर पैशाची मागणी करीत होते आज जवळपास ७० गाडी कापूस शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणला असता खरेदी बंद असल्याच्या सुचना देण्यात आल्या जीव घेण्यात उन्हात शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा होत होत्या बाजार समितीची अडवणूक कूपन प्रणाली यामुळे शेतकर्यांचा संयम सुटल्याने युवा शेतकऱ्यांनी सकाळी १० वाजता चंद्रपूर आदिलाबाद राज्यमार्ग रोखून धरून चक्काजाम आंदोलन सुरू केले दोन तास शेतकरी उन्हात आंदोलन करीत होता अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर विलास यामावर यांनी आंदोलना स्थळ गाठून शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या दबावाखाली टोकण पद्धती बाजूला ठेवून आज आलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहेत सीसीआय द्वारे तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.
Related Articles
कोरपना येथे हिरो शोरूम ला भीषण आग
संपूर्ण शोरूम बेचिराख ; कोट्यावधीचे नुकसान कोरपना – कोरपना येथील चंद्रपूर महामार्गावरील आदर्श टू व्हीलर गाड्यांच्या हिरो शोरूम ला बुधवारी मध्यरात्री दरम्यान अचानक रित्या भीषण आग लागल्याने संपूर्ण शोरूम मधील साहित्यांची राख रांगोळी झाली. यात शोरूमचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. मध्यरात्री दरम्यान लागलेल्या आगीत शोरूम मधील नव्या कोऱ्या गाड्या , टू व्हीलर चे ॲक्सेसरीज , […]
आजचे कोरोना अपडेट
चंद्रपूर, दि. 21 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 1 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, […]
आजचे कोरोना अपडेट
बुधवारी एकही मृत्यु नाही, 3 कोरोनामुक्त, 2 पॉझिटिव्ह चंद्रपूर, दि. 11 ऑगस्ट: गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 2 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 2 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका […]



