ब्रह्मपुरी (प्रतिनिधी)तालुका मुख्यालयापासून 12 किमी अंतरावर असलेल्या नान्होरी जिल्हा परिषदेच्या शाळेत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये असलेल्या युवतीने गावातीलच एका इसमाने विनयभंग केल्याची तक्रार ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात दि 25 मे रोजी दाखल केली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ माजली असून क्वारंटाईन व्यक्तीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. क्वारंटाईन व्यक्ती कितपत सुरक्षित आहेत आणि प्रशासन त्यांची कितपत चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे हे वरील तक्रारीवरून समजून येते.याधारे ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात आरोपी काकाजी प्रधान यांच्याविरोधात कलम 294,323,354,506 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे करीत आहेत.
Related Articles
महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग देशात अव्वल व्हावा : सुधीर मुनगंटीवार, वन व सांस्कृतिक मंत्री
मुंबई:- महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग देशातील सर्व राज्यांच्या सांस्कृतिक विभागात अव्वल व्हावा, त्यासाठी सांस्कृतिक विभागाने जोमाने कामाला लागावे असे निर्देश आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात सांस्कृतिक कार्य खात्याची आढावा बैठक त्यांनी घेतली तेव्हा ते बोलत होते. सांस्कृतिक खात्यांतर्गत येणाऱ्या प्रत्येक संस्थेच्या व विभागांच्या कार्यालयांना आपण भेटी देणार आहोत आणि समस्या समजून […]
वरोरा तालुक्यात प्रशासनाच्या समन्वयाने थांबला बालविवाह
वरोरा तालुक्यात बालविवाह होत असल्याबाबतची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरोराचे उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी, पोलीस निरीक्षक श्री. काचोरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोंखडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महीला व बालविकास) संग्राम शिंदे यांच्या समन्वयाने तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा व महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात बालविवाह […]
अवैध व्यवसायांवर प्रतिबंध घाला – आ. किशोर जोरगेवार
पोलिस अधिक्षकांची भेट घेत केल्या सुचना जिल्ह्यातील दारुबंदी उठल्या नंतर दारुबंदी व्यवसायात गुंतलेले गुणगारी प्रवृत्तीच्या गुंडांनी इतर अवैध व्यवसाय सुरु केले आहे. यात ऑनलाईन क्रिकेट जुगार चालविण्या-र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे युवा वर्ग यात गुंतत असुन अनेकांनी आर्थिक नुकसाणीमुळे आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहे. याकडे गांभिर्याने लक्ष देत जिल्हात सुरु असलेल्या अवैध व्यवसायांवर प्रतिबंध […]


