
चंद्रपूर जिल्ह्यातील कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या (officers of Water Conservation Office, Chandrapur ) कामाच्या बिलाची वितरीत केलेल्या बिलाकरिता व उर्वरित रक्कम वितरीत करण्याकरिता 50 लाखाची लाच घेतल्याप्रकरणी जलसंधारण कार्यालय चंद्रपूर येथील 2 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नागपूर येथे मंगळवारी उशिरा करण्यात आली. दरम्यान या कारवाईत नागपूर च्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून, आरोपी त एकूण 3 आरोपीचा समावेश आहे. बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या कामाच्या बिलाची वितरीत केलेल्या बिलाकरिता व उर्वरित रक्कम वितरीत करण्याकरिता तक्राराकडून अधिकाऱ्याने 81 लाख रक्कमेची मागणी केली. त्यातील 50 लाख रुपयांची रक्कम स्वीकारतना 3 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीत चंद्रपूर चे प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे, नागपूरचे; जिल्हा जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील, चंद्रपुरातील विभागीय; लेखाधिकारी रोहीत गौतम यांचा समावेश आहे. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापूरे यांनी केली




