चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

देहव्यापार करणाऱ्या दाम्पत्यांस अटक- स्थानिक गुन्हे शाखा व ब्रम्हपुरी पोलीसांची संयुक्त कारवाई

चंद्रपूर : ब्रह्मपुरी शहरात एक दाम्पत्य देहव्यापार चालवत असल्याच्या माहिती वरून व एका अल्पवयीन मुलीला कलकत्ता येथून आणून देहविक्री करत असल्याने स्थानिक गुन्हे शाखा व ब्रम्हपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत देहव्यापार करणाऱ्या पती-पत्नीस धाड टाकून अटक करण्यात आली आहे.   ब्रम्हपुरी शहरातील काही भागात बाहेरून मुली आणून त्यांच्याकडून देह व्यापार करवून घेतला जात आहे तसेच कलकत्ता येथून देहव्यापारासाठी अपहरण करण्यात आलेली मुलगी ब्रह्मपुरी शहरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना प्राप्त झाली होती. स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी ब्रह्मपुरी गाठून मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेटमध्ये वास्तव्यास असलेले लोणारे दाम्पत्याच्या घरी धाड टाकत अटक केली व अपहृत मुलीला ताब्यात घेत तिची सुटका केली.  कलकत्ता येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नागपूरला आणण्यात आले तेथून मुलीला चंद्रपूररात आणण्यात आले. चंद्रपूरवरून अल्पवयीन मुलीला परत नागपूरला नेण्यात आले. नागपूरवरून लोणारे दाम्पत्यानी तिला ब्रह्मपुरीला घेऊन गेले. कलकत्ता येथून अपहरण करून आणलेली मुलगी ब्रह्मपुरीला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी पोलिसांनी सापळा रचून अल्पवयीन मुलीची लोणारे दाम्पत्याच्या तावडीतून सुटका केली. लोणारे दाम्पत्य शहरात किरायाने घर घेऊन तिथे बाहेरून मुली आणून देह विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची गोपनीय माहिती सूत्रानी पोलिसांना दिली होती.  स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व ब्रह्मपुरी पोलिसांच्या संयुक्त कार्यवाहीनंतर या कार्यवाहीत सोबत असलेल्या व अल्पवयीन मुलींना देहव्यापारपासून मुक्त करण्याचे काम करणाऱ्या नागपूर येथील एका सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.  मंजित रामचंद्र लोणारे (४०), चंदा मंजित लोणारे (३२) या पती, पत्नीवर पोलिसांनी मानव तस्करी अधीनियम, पोस्को, पिटा ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अरवींद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपूरी मिलींद शिंदे यांचे नेतृत्वात पो. नि. बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पो.नि. मनोज गजभे, ठाणेदार पो.स्टे. चिमूर, स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. संदीप कापडे, स.पो.नि. मंगेश भोयर, स.फौ. राजेंद्र खनके, पो.हवा. स्वामीदास चालेकर, पो.कॉ. गणेश भोयर, गोपिनाथ नरोटे, प्रदीप मडावी व पो.स्टे. ब्रम्हपूरी येथील म.पो. कॉ. भाविका लाडे यांनी केली असुन पुढील तपास पो.स्टे. ब्रम्हपूरी येथील पोलीस अधिकारी हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.