चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

मारेगाव : पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या वेगाव येथे  एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना  आज बुधवार (ता. मे४) रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मनिषा अनिल कोवे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी पोलीसांना दिली असुन बातमी लिहे पर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते.
सविस्तर माहिती अशी की मंगळवार दि. 3 मे रोजी मनिषा शौचालयासाठी घरा बाहेर पडली तरी मनिषा घरी न परतल्याने कुटुंबीय व गावांतील नातेवाइकांनी शोध घेतला असता शोध लागला नसल्याने आज दि. ४मे रोज बुधवारला गावालगत असलेल्या रामदास लांडे यांच्या शेताच्या विहिरींमध्ये पाण्यात मृतदेह तरंगताना  आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास दिसून आल्याने. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.