चंद्रपुर

22 संघटनांचा ऍड. अभिजित वंजारी यांना पाठींबा जनता महाविद्यालयातील प्रांगणात सहविचार सभा संपन्न

चंद्रपुर (प्रतिनिधी) :परीवर्तन मिशन हे ब्रीदवाक्य घेवुन पदविधर मतदार संघाच्या निवडणुक रींगणात पदविधरांच्या समस्या निराकरण व विकासाकरीता कार्य करण्यासाठी उमेदवारी घेवुन असल्याचे अॅड. अभिजित गोविंदराव वंजारी यांनी येथे आयोजित सहविचार सभेत सांगितले.महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. अभिजित गोविंदराव वंजारी यांच्या प्रचारार्थ सहविचार सभा जनता महाविद्यालय, सिव्हील लाईन, चंद्रपुर येथे (दि.25) ला संपन्न झाली. सभेत बावीस संघटनांनी अॅड. अभिजित वंजारी यांना पाठींबा दिला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, मुख्य वक्ते उमेदवार अॅड. अभिजित वंजारी, मुख्य अतिथी पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार, खास. बाळूभाऊ धानोरकर व माजी आमदार देवराव भांडेकर, बाबासाहेब वासाड़े, प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे, प्राचार्य अनिल शिंदे, प्राचार्य सुर्यकांत खनके, उपस्थित होते. सहविचार सभेच्या व्यासपिठावरुन सर्व मान्यवर, संघठना व उपस्थितांनी विजयाचा सकल्प केला. उपस्थित सर्वांनी बहुजन समाजातील ओबीसी उमेदवार निवडून दयावा, असे जाहीर आवाहन सहविचार सभेत संस्थाचालक संघ, प्राचार्य फोरम, नुटा, यंग टीचर्स, विजुक्टा, मुख्याध्यापक संघ, चंद्रपुर जिल्हा मुख्याध्यापक असो., विमाशी संघ, पदविधर शिक्षक संघटना, पुरोगामी शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक संघ, चित्रकला शिक्षक संघ, एमसीव्हीसी, बायफोकल विभाग, म.रा. जुनी पेंशन हक्क संघठन, जि. चंद्रपुर, जेष्ट नागरीक संघ, वकील असोसिएशन, ओबीसी कर्म. संघटना, महा. शिक्षकेत्तर कर्म. संघटना, माध्यमिक शिक्षकेत्तर कर्म. संघटना, शिक्षकेत्तर कर्म. संघ., सेवानिवृत्त प्राथ.शिक्षक संघ, म.रा. उच्च माध्य.-क. महा. शाळा कृती संघठना, म.रा.प्राथ. शिक्षक समिती, ओबीसी कर्म.अधीकारी संघटना, आदींनी पाठींबा दिला संचालन व आभार प्रा. रवि वरारकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.