चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४६७
२९३कोरोनातून बरे ; १७४ वर उपचार सुरु चंद्रपूर दि. २८ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४६७ झाली आहे. २९३ बाधित बरे झाले असून १७४ बाधितावर उपचार सुरू आहेत.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आज पुढे आलेल्या २० बाधितामध्ये चंद्रपूर जिल्हयातील मूल, नागभिड, सिंदेवाही, सावली, राजुरा, बल्लारपूर, वरोरा तालुका व चंद्रपूर शहरातील नागरिकांचा अधिक समावेश आहे .




