चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

हुंड्यासाठी एका सुशिक्षित प्राध्यापकाने पत्नीला अटकवले फासावर

चंद्रपुर :- हुंड्यासाठी एका सुशिक्षित प्राध्यापकाने भाऊ व वडिलांसोबत आपल्या पत्नीला फासावर लटकवल्याची  खळबळजनक घटना राजूरा शहरात घडली पीडित पत्नीने राजूरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने सदर बाब उघडकीस आली.  राजूरा शहरातील यादवराव धोटे महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक मंगेश कुलमेथे यांचे चार महिण्याआधी लग्न झाले, आई वडील व भाऊ असे संयुक्त कुटुंब असताना हळू हळू परिवारात वाद सुरू झाल्याने मंगेश कुलमेथे पत्नी सह आईवडील व भावा पासून बाजूलाच वेगळे राहू लागले. प्रा कुलमेथे पत्नीला माहेरून पैसे आणण्यास दबाव टाकू लागले, पत्नीने माहेरून एकदा दोन लाख रुपये आणून दिले परंतु कुलमेथे कुटुंब वारंवार हुंड्याची मागणी करीत त्रास देत होते. दिनांक 14 ऑक्टोबरला परत प्रा कुलमेथे यांनी पैसे आणण्यास पत्नीसोबत वाद सुरू केला दरम्यान शेजारीच राहणाऱ्या वडील व भावाला बोलावून पैसे आणण्यास दमदाटी केली त्यानंतर पलंगावर खुर्ची ठेऊन मद्यधुंद प्राध्यापक, वडील व भाऊ यांनी मिळून प्राध्यापकाच्या पत्नीला पंख्याला दोरी लावून फासावर अटकवले आणि सर्व समोरच्या खोलीत बसले सुदैवाने फासाची दोरी तुटल्याने महिला सुखरूप खाली आली व मागच्या दाराने पळण्यात यशस्वी झाली व माहेरी निघून गेली.  दोन दिवसांनंतर महिलेने सर्व आपबिती आपल्या बहिणीला सांगितली अखेर 18 सप्टेंबर रोजी रात्रोच्या सुमारास राजूरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. राजूरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून भांदवी अन्वये कलम 307 अंतर्गत प्रा. कुलमेथे, वडील व भावा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सपोनि साखरे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *