चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

सिएसटीपीएसच्या राखेमुळे शेतपिकांचे नुकसाण होणार नाही याची दक्षता घ्या – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर महाऔष्णीक विज केंद्राच्या राख वाहिनींमधुन राख गळती सुरु आहे. ही राख शेतक-यांच्या शेतात जात असुन शेत पिकांचे आणि शेत जमीनींचे मोठे नुकसाण होत आहे. हा गंभीर प्रकार असुन ही गळती तात्काळ थांबवत सिएसटीपीएसच्या राखेमुळे शेतपिकांचे नुकसाण होणार नाही याची दक्षता घ्या अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांना केल्या आहे.विविध विषयांना घेन आज हिराई विश्राम गृह येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिका-यांची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत त्यांनी या सूचना केल्या आहे. या बैठकीला सिएसटीपीएसचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवारउपमुख्य अभियंता शाम राठोडविराज चौधरीअनिल पुनसेमहेश राजुरकरअधिक्षक अभियंता मिलींद रामटेकेसचिन भागेवारदिशेन चौधरीकामगार कल्यान अधिकारी दिलीप वंजारीकार्यकारी अभियंता विनोद उरकुडेअनिल हजारेसहायक कल्यान अधिकारी राजु धोपटेअधिक्षक अभियंता महेश परातेकार्यकारी अभियंता हेमंत लांजेवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेचे कार्यकारणी अध्यक्ष हरमन जोसेफ, यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामिण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकरमोरवा सरपंच स्नेहा साव, छोटा नागपूरचे उपसरपंच ऋषभ दुपारेमोरवा उप सरपंच भुषन पिदुरकरविचोडा ग्रामपंचायत सदस्य संजय बोबडेयंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष सलिम शेखअल्पसंख्याक विभाग युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेनयुवा नेते अमोल शेंडेशहर संघटक विश्वजीत शहाप्रतिक शिवणकरप्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार, करणसिंग बैसतापोष डेविलास सोमलवारराम जंगमअँड. परमहंस यादवगौरव जोरगेवारनाम सिंह मिरधा, गणपत कुडे, कालीदास रामटेकेकोसारा माजी सरपंच गुड्डू सिंगनितिन कार्लेकरमुन्ना जोगीराम मेंढे, आनंद रणशूरकुणाल जोरगेवारप्रकाश पडाल आदींची उपस्थिती होती.  सिएसटीपीएस येथे काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे. आलेल्या या तक्रारी आपण प्राथमीकतेने सोडविल्या पाहिजेमौजा नागपूर(छोटा)विचोडाचारगावमोरवाताडाळीपडोली येथील शेतकऱ्यांच्या शेतालगत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र ची नवीन राख वाहीणी आहे. ह्या वाहिनी मधून राख गळती होऊन शेतालगत राखेचा ढिगारा लागला आहे. परिणामी शेतपीकांचे व जमीनीचे नुकसाण होत आहे. त्यामुळे याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावाछोटा नागपूर व विचोडा या गावातील नाला सिएसटीपीएसच्या अँश बंड मधून येणाऱ्या राखेमुळे पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात सदर नाल्यातील पाणी परिसरात साचते आणि त्यानंतर येथील राख व घाण पाणी शेतकर्यांच्या शेतात जात असून पिकांची नासाडी होत आहे याकडे लक्ष देन सदर नाला स्वच्छ करण्यात यावाछोटा नागपूरविचोडा येथील पुलाचे काम तात्काळ करण्यात यावे. कामगारांना इएसआयसी योजनेचा लाभ देण्यात यावाकंत्राटदारांनी सर्व कंत्राटी कामगारांचे पीएफ प्रत्येक महिन्याला त्यांच्या पिएफ खात्यात जमा करावेचंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रतर्फे कंत्राटदारांना देण्यात आलेले काम पूर्ण तपासून व निर्धारित लक्ष पूर्ण झाल्याची तपासणी करून कंत्राटदारांना त्यांचे देयके देण्यात यावेकंत्राटी कामगारांना त्यांच्या सोपविलेल्या तांत्रिक कामानुसार त्यांना कुशलअर्धकुशल व अकुशल श्रेणी नुसार वेतन देण्यात यावेसंपूर्ण कंत्राटी कामगारांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत वेतन देण्यात यावेकंत्राट मुदत संपायच्या  महिन्या अगोदर नवीन कंत्राट पुनर्प्रक्रिया सुरु करण्यात यावीकंत्राटी कामगारांच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी सहायक कामगार आयुक्तचंद्रपूर यांच्या समवेत प्रत्येक महिन्यात बैठकीचे आयोजन करण्यात यावेकंत्राटी कामगारांना कुठल्याही अपघातात अपंगत्व आल्यास त्यांना त्यांच्या सोयीचे काम देण्यात यावेपोलीस व्हेरिफिकेशन ची सहा महिन्याची अट रद्द करून दोन वर्षांनी सदर प्रमाणपत्र सदर करण्याची मुभा देण्यात यावी. अशा सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिका-यांना केल्या आहे. यावेळी छोटा नागपूर विचोडा येथील अँश वाहिनीतील गळती मुळे बंद झालेल्या नाल्याचे खोलीकरण तात्काळ करण्यात येणार असल्याचे यावेळी सिएसटीपीएसच्या अधिकार्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *