चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

शहरातील सिस्टर कॉलनी येथील घरात सिलेंडरचा स्फोट,

चंद्रपुर :-शहरातील सिस्टर कॉलनी येथील एका घरात सिलेंडर लीक झाल्याने आग लागल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेत मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.  दरम्यान परिसरातील नागरिकांनी रामनगर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. मंगळवारी दुपारी शहरातील सिस्टर कॉलनी परिसरात राहणाऱ्या कृष्णा टेम्भुरडे यांच्या घरात सिलेंडरने अचानक पेट घेतला. यावेळी त्यांनी घरातील गाद्या टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यानं तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.