वैद्यकीय चाचणीत अपात्र झालेल्या वेकोलि प्रकल्पग्रस्तांना शारीरिक क्षमतेच्या आधारावर लाईट जॉब अथवा मासिक मानधन देण्यासाठी कोल इंडियाकडे प्रस्ताव पाठवा – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री प्रकल्पग्रस्त शेतकरी हा प्रत्येक प्रकल्पाच्या उभारणीसह यशस्वीततेसाठी महत्वाचा कणा असतांना त्यांना दुर्लक्षित करून प्रकल्प चालविणे हा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय असल्याने सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पात सन्मानजनक रोजगार व रास्त मोबदला मिळणे हा त्यांचा न्यायिक अधिकार आहे. असे असतांना वेकोलि च्या माध्यमातून काही प्रकल्पग्रस्तांना वैद्यकीय चाचणीत अपात्र ठरविण्यात आले परंतु या सर्व प्रकल्पग्रस्तांना शारीरिक क्षमतेच्या लाईट जॉब अथवा मासिक मानधन देण्यात यावे अशा सूचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेकोलि वणी क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे यांना बैठकीच्या माध्यमातून केल्या. पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षेत पार पडलेल्या बैठकीला क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे, कार्मिक विभागाचे श्री मनोगरन व प्रकल्पग्रस्तांमध्ये विशाल मिलमिले, धनराज पिंपळशेंडे, अक्षय बल्की, निलेश घुगरूळ, मनोज खाडे, ऋषी रासेकर, स्वप्नील वासेकर, आशिष ठेंगणे, दिवेश देठे यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची उपस्थिती होती. सदर बैठकी दरम्यान हंसराज अहीर यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या विषयाला अनुसरून न्याय मिळावा याकरिता महाप्रबंधक कार्यालयातून त्वरित सकारात्मक प्रस्ताव कोल इंडिया च्या मुख्यालयात सादर करण्याच्या सूचनाही केल्या. अनेक प्रकल्पग्रस्त आजही आपल्या रोजगार व मोबदल्याची प्रयत्नरत असतांना त्यांना शुल्लक कारणास्तव वैद्यकीय चाचणीत अपात्र ठरविण्याचा प्रपंच हा चुकीचा असतांना या सर्व प्रकल्पग्रस्तांना मासिक मानधन अथवा लाईट जॉब मिळणे हा प्रकल्पग्रस्तांचा अधिकार आहे असेही यावेळी हंसराज अहीर यांनी सांगितले.
Related Articles
शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या 15 आमदारांना केंद्राकडून सुरक्षा
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार सध्या आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये आहेत. महाविकास अघाडी सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षपाती राजकारणाला कंटाळून शिवसेनेच्या आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात पेच निर्माण झाला आहे. आमदारांच्या संख्याबळा अभावी महाविकास आघाडी सरकार पडणार का? अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान राज्यातील […]
वाघाच्या हल्ल्यात युवकाचा नाहक बळी…
वनाधिकारी व पोलीस अधिकाऱ्याविरूध्द पोलीसात तक्रार शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकरी युवकावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान तालुक्यातील पडझरी येथे घडली. प्रमोद झुंगाजी मोहुर्ले वय ३२ असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तालुक्यातील भादुर्णी गट ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या पडझरी येथील युवा शेतकरी प्रमोद मोहुर्ले नेहमी […]
‘पंचप्रण’ शपथेतून कर्तव्यदक्ष राहण्याचा संकल्प
नियोजन सभागृहात अधिकारी कर्मचा-यांनी घेतली शपथ चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप ‘मेरी माटी, मेरा देश’ (माझी माती, माझा देश) अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. शासनाच्या सुचनेनुसार या अभियानांतर्गत जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी सर्व शासकीय कार्यालयात ‘पंचप्रण’ शपथेचे आयोजन करण्यात आले. नियोजन भवनात झालेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात अधिकारी व […]



